Join us  

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जाहीर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचे दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 8:36 AM

Petrol diesel price today : पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत प्रतीलिटर डिझेलसाठी 96.64 रुपये मोजावे लागत आहेत.

ठळक मुद्देवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 20 पैशांची कपात झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत.

Petrol diesel price today : आज पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol diesel price today) स्थिर आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 20 पैशांची कपात झाली होती. 

पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत प्रतीलिटर डिझेलसाठी 96.64 रुपये मोजावे लागत आहेत. तर पेट्रोलचा दर प्रतिलीटर 107.66 रुपये इतका आहे. दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 101.74 तर एका लीटर डिझेलसाठी 89.07 रुपये मोजावे लागत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. तसेच, तज्ज्ञांनी यामध्ये अजून घट होईल असा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ब्रेंट क्रूडने सध्या सुमारे 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर धडक दिली आहे.

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol Diesel Price on 23 August 2021)>> दिल्ली पेट्रोल 101.64 रुपये आणि डिझेल 89.07 रुपये प्रतिलीटर >> मुंबई पेट्रोल 107.66 रुपये आणि डिझेल 96.64 रुपये प्रतिलीटर >> चेन्नई पेट्रोल 99.32 रुपये आणि डिझेल 93.66 रुपये प्रतिलीटर >> कोलकाता पेट्रोल 101.93 रुपये आणि डिझेल 92.13 रुपये प्रतिलीटर >> नोएडा पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 89.64 रुपये प्रतिलीटर >> जयपूर पेट्रोल 108.56 रुपये आणि डिझेल 98.22 रुपये प्रतिलीटर >> भोपाळ पेट्रोल 110.06 रुपये आणि डिझेल 97.88 रुपये प्रतिलीटर 

दररोज सकाळी 6 वाजता बदलतात दरदररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भावतुम्ही एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

टॅग्स :पेट्रोलडिझेलव्यवसाय