Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol, Diesel Price: अच्छे दिन! पेट्रोल, डिझेल दर स्वस्ताईला सुरुवात; सलग दुसऱ्या दिवशी घसरण

Petrol, Diesel Price: अच्छे दिन! पेट्रोल, डिझेल दर स्वस्ताईला सुरुवात; सलग दुसऱ्या दिवशी घसरण

Petrol, Diesel gets cheaper: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या 15 दिवसांत 10 टक्क्यांनी घसरले आहेत. युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यामुळे तिथे इंधनाची मागणी घटण्याची शक्यता आहे. यामुळे 71 डॉलरवर गेलेले कच्च्या तेलाचे बॅरल 64 डॉलरवर आले आहे. यामुळे ऑईल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 08:50 AM2021-03-25T08:50:22+5:302021-03-25T08:50:46+5:30

Petrol, Diesel gets cheaper: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या 15 दिवसांत 10 टक्क्यांनी घसरले आहेत. युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यामुळे तिथे इंधनाची मागणी घटण्याची शक्यता आहे. यामुळे 71 डॉलरवर गेलेले कच्च्या तेलाचे बॅरल 64 डॉलरवर आले आहे. यामुळे ऑईल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केली आहे. 

Petrol, Diesel Rates Cut For Second Consecutive Dayl; petrol by 21 paisa, diesel by 20 paisa | Petrol, Diesel Price: अच्छे दिन! पेट्रोल, डिझेल दर स्वस्ताईला सुरुवात; सलग दुसऱ्या दिवशी घसरण

Petrol, Diesel Price: अच्छे दिन! पेट्रोल, डिझेल दर स्वस्ताईला सुरुवात; सलग दुसऱ्या दिवशी घसरण

गगनाला भिडलेल्या पेट्रोल (petrol), डिझेलचे (diesel) दर आता उतरायला सुरुवात झाली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी इंधनाचे दर उतरले आहेत. जीएसटीमध्ये पेट्रोल, डिझेल घेणार की नाही हे अद्याप चर्चेचाच भाग असले तरीही वाढत्या महागाईमध्ये आणि कोरोनाच्या संकटामध्ये इंधनाच्या किंमती उतरायला लागल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (the price of petrol has been reduced by 21 paise and diesel has been cut by 20paise per litre today.)


देशात आज पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 20 पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल आज 97.19 रुपये प्रति लीटर तर डिझेल 88.20 रुपये प्रति लीटर झाले. काल मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 97.40 रुपये झाला. सोमवारपर्यंत हा दर 97.57 रुपये प्रति लीटर होता. तर डिझेलचा दर 88.42 रुपये प्रति लीटर झाला होता. सोमवारपर्यंत हा दर 88.60 रुपये प्रति लीटर होता. गेल्या महिन्यात सलग 16 दिवस पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. राजस्थानसह अन्य राज्यांच्या काही शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली होती.

Petrol Diesel Price:जवळपास अर्ध्यावर येऊ शकतात पेट्रोल-डिझेलचे दर; पाहा कसे?


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या 15 दिवसांत 10 टक्क्यांनी घसरले आहेत. युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यामुळे तिथे इंधनाची मागणी घटण्याची शक्यता आहे. यामुळे 71 डॉलरवर गेलेले कच्च्या तेलाचे बॅरल 64 डॉलरवर आले आहे. यामुळे ऑईल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केली आहे. 

कंपन्यांना मोठा तोटा...
पेट्रोल - डिझेलच्या दराचा दररोज घेतला जाणारा आढावा २४ दिवसांपासून बंद करण्यात आल्यामुळे तेल वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रतिलिटर ४ रुपये आणि डिझेलच्या विक्रीवर प्रतिलीटर २ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. सुत्रांनी सांगितले की, या २० दिवसांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोलचा दर वाढून मुंबईत किमान १०३ रुपये लिटर, इतर अनेक शहरांत  १०० रुपये लीटर व्हायला हवा होता. तथापि, ही दरवाढ रोखण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर २७ फेब्रुवारीपासून कंपन्यांनी इंधन दरवाढ रोखून धरली आहे. या काळात कच्च्या तेलाचे दर ६४.६८ डॉलर प्रतिबॅरलवरून ६६.८२ डॉलरवर गेले आहेत. मध्ये तर ते ६८.४२ डॉलर झाले होते. 

या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरून ७२,५७ वर गेला आहे. १७ फेब्रुवारी रोजी राजस्थानातील श्रीगंगानगर येथे पेट्रोल सर्वप्रथम १०० रुपये लीटर झाले होते. त्यानंतर इतरही अनेक शहरांत पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली होती. सर्वच राज्यात पेट्रोल ९० रुपयांच्या वर गेलेले आहे.  मात्र प्रिमिअम पेट्रोलचे दर आणखी जास्त आहेत.

Web Title: Petrol, Diesel Rates Cut For Second Consecutive Dayl; petrol by 21 paisa, diesel by 20 paisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.