Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोलचे दर नऊ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर; जाणून घ्या आजचे भाव

पेट्रोलचे दर नऊ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर; जाणून घ्या आजचे भाव

तसेच एक लीटर डिझेलसाठी 63.26 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करत असतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 08:55 AM2020-03-09T08:55:05+5:302020-03-09T09:16:34+5:30

तसेच एक लीटर डिझेलसाठी 63.26 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करत असतात. 

petrol diesel rates today petrol prices cut by 23 25 paise diesel prices mumbai kolkata chennai vrd | पेट्रोलचे दर नऊ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर; जाणून घ्या आजचे भाव

पेट्रोलचे दर नऊ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर; जाणून घ्या आजचे भाव

Highlightsआठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झालेल्या आहेत. देशातल्या प्रमुख महानगरांत लागोपाठ पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात घसरण झाली आहे. तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या किमतीत 23 ते 25 पैसे प्रतिलिटर एवढी कपात केली आहे.

नवी दिल्लीः आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झालेल्या आहेत. देशातल्या प्रमुख महानगरांत लागोपाठ पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात घसरण झाली आहे. तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या किमतीत 23 ते 25 पैसे प्रतिलिटर एवढी कपात केली आहे. तर डिझेलच्या दरातही 25 ते 26 पैसे प्रतिलिटर कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक लीटरच्या पेट्रोलचा भाव 70.59 रुपये झाला आहे. तसेच एक लीटर डिझेलसाठी 63.26 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करत असतात. 

चार शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, सोमवारी दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत 70.59 रुपये झाली आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोलचा दर 73.28 रुपये, मुंबईत 76.29 रुपये आणि चेन्नईमध्ये 73.33 रुपये आहे. 
राष्ट्रीय राजनाधी दिल्ली डिझेलची किंमत 63.26 रुपये प्रतिलिटर झाली आहे. कोलकात्यात एक लीटर डिझेलचे दर 65.59 रुपये, मुंबईत 66.24 रुपये आणि चेन्नईत 66.75 रुपये झाले आहेत.  

असे समजून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर
देशातल्या तीन ऑइल मार्केटिंग कंपनी HPCL, BPCL आणि IOC सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. नव्या दरांसंदर्भात आपल्या वेबसाइटवर माहिती मिळू शकते. मोबाइल फोनवर SMS पाठवूनही दर तपासून पाहू शकता.  
92249 92249 नंबरवर SMS पाठवून पेट्रोल-डिझेलचे दरांसंदर्भात माहिती मिळणार आहे. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249वर पाठवावा लागणार आहे. दिल्लीला पेट्रोल-डिझेलचे दर माहिती करून घ्यायचे असल्यास तुम्ही RSP 102072 लिहून 92249 92249वर पाठवू शकता. 


4 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात घसरण झाल्यानं त्याचा परिणाम घरगुती बाजारावरही दिसून आला आहे. या वर्षी पेट्रोलच्या दरात 4 रुपये प्रतिलिटर कपात नोंदवली गेली आहे. तसेच डिझेलच्या दरातही आता 4.15 रुपये प्रतिलिटर कपात झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यानं पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. 

Web Title: petrol diesel rates today petrol prices cut by 23 25 paise diesel prices mumbai kolkata chennai vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.