Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत मे महिन्यात मोठी वाढ; दरवाढ होऊनही इंधन मागणी वधारली!

पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत मे महिन्यात मोठी वाढ; दरवाढ होऊनही इंधन मागणी वधारली!

देशातील आर्थिक घडामोडीतील वाढ आणि पीक काढणी यामुळे इंधनाची मागणी वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 06:19 AM2022-05-17T06:19:57+5:302022-05-17T06:20:27+5:30

देशातील आर्थिक घडामोडीतील वाढ आणि पीक काढणी यामुळे इंधनाची मागणी वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

petrol diesel sales rise sharply in month of may fuel demand rises despite price hike | पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत मे महिन्यात मोठी वाढ; दरवाढ होऊनही इंधन मागणी वधारली!

पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत मे महिन्यात मोठी वाढ; दरवाढ होऊनही इंधन मागणी वधारली!

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मे महिन्यात भारतातील पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. देशातील आर्थिक घडामोडीतील वाढ आणि पीक काढणी यामुळे इंधनाची मागणी वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोलची विक्री आदल्या महिन्याच्या तुलनेत १४ टक्क्यांची वाढली आहे. डिझेलच्या विक्रीत १.८ टक्के, तर स्वयंपाकाच्या गॅसच्या विक्रीत २.८ टक्के वाढ झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील किरकोळ इंधन विक्रेत्यांनी १ ते १५ मे या कालावधीत १२.८ लाख टन पेट्रोल विकले. गेल्या वर्षीच्या याच अवधीच्या तुलनेत ही विक्री ५९.७ टक्क्यांनी अधिक आहे. २०१९ च्या या कालवाधीच्या तुलनेत ती १६.३ टक्क्यांनी अधिक आहे. डिझेलची विक्री वार्षिक आधारावर ३७.८ टकक्यांनी वाढून ३०.५ लाख टनांवर गेली.

Web Title: petrol diesel sales rise sharply in month of may fuel demand rises despite price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.