Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG नंतर आता Petrol- Diesel होणार स्वस्त? महागाईविरोधात सरकार तयार करतेय ॲक्शन प्लॅन

LPG नंतर आता Petrol- Diesel होणार स्वस्त? महागाईविरोधात सरकार तयार करतेय ॲक्शन प्लॅन

घरगुती, व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतील कपातीनंतर आता सरकार पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याच्या विचारात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 01:14 PM2023-09-05T13:14:43+5:302023-09-05T13:15:52+5:30

घरगुती, व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतील कपातीनंतर आता सरकार पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याच्या विचारात आहे.

Petrol Diesel will be cheaper after LPG The government is preparing an action plan against inflation know details | LPG नंतर आता Petrol- Diesel होणार स्वस्त? महागाईविरोधात सरकार तयार करतेय ॲक्शन प्लॅन

LPG नंतर आता Petrol- Diesel होणार स्वस्त? महागाईविरोधात सरकार तयार करतेय ॲक्शन प्लॅन

Petrol- Diesel Price Revision: महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत आहे. घरगुती, व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतील कपातीनंतर आता सरकार पेट्रोलडिझेलचे दर कमी करण्याच्या विचारात आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्या (OMCs) लवकरच पेट्रोलडिझेलच्या किंमतींवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दोन तिमाहिंमध्ये पेट्रोल डिझेल कंपन्यांना नुकसानीऐवजी नफा झाला आहे. अशात कंपन्या ग्राहकांना फायदा देण्याची शक्यता आहे.

९ सप्टेंबरला पेट्रोल पंप डीलर्सची बैठक
मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल पंप डीलर्सची ९ सप्टेंबर रोजी बैठक पार पडणार आहे. यामध्ये डीलर्सचं कमिशन वाढवण्यावर चर्चा केली जाईल. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणते बदल होणार असतील त्याची पूर्वी माहिती द्यावी यासंदर्भात ऑईल मार्केटिंग कंपन्यांना एक पत्रही देण्यात येणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात
केंद्र सरकारनं देशवासीयांना रक्षाबंधनापूर्वी सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर देशात १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत घसरण झाली होती. दरम्यान, विना अनुदानीत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती आता सप्टेंबर २०१४ च्या किंमतीवर आल्या आहेत. तर दुसरीकडे कमर्शिअल एलपीजीच्या किंमतीतही १५७.५ रुपयांची कपात करण्यात आली होती.

Web Title: Petrol Diesel will be cheaper after LPG The government is preparing an action plan against inflation know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.