Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्राेल महाग आपल्यासाठी, नाेटांच्या राशी त्यांच्यासाठी, कंपन्या लाटताहेत स्वस्त तेलाचा फायदा

पेट्राेल महाग आपल्यासाठी, नाेटांच्या राशी त्यांच्यासाठी, कंपन्या लाटताहेत स्वस्त तेलाचा फायदा

Petrol Price: अमेरिकेत मंदीची शक्यता आणि चीनमधील सुस्त झालेल्या आर्थिक घडामाेडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत या आठवड्यात माेठी घसरण झाली आहे. वर्षभरात कच्च्या तेलाचे दर एकीकडे सुमारे २४ टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना मिळालेला नाही. भाव घटल्यामुळे तेल कंपन्यांचा नफा वाढणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 08:25 AM2024-09-06T08:25:58+5:302024-09-06T09:11:29+5:30

Petrol Price: अमेरिकेत मंदीची शक्यता आणि चीनमधील सुस्त झालेल्या आर्थिक घडामाेडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत या आठवड्यात माेठी घसरण झाली आहे. वर्षभरात कच्च्या तेलाचे दर एकीकडे सुमारे २४ टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना मिळालेला नाही. भाव घटल्यामुळे तेल कंपन्यांचा नफा वाढणार आहे.

Petrol Expensive for Us, Nets Costly for Them, Companies Exploit Cheap Oil, Crude Oil Prices Fall 24 Percent in a Year, Expensive Oil for Commoners | पेट्राेल महाग आपल्यासाठी, नाेटांच्या राशी त्यांच्यासाठी, कंपन्या लाटताहेत स्वस्त तेलाचा फायदा

पेट्राेल महाग आपल्यासाठी, नाेटांच्या राशी त्यांच्यासाठी, कंपन्या लाटताहेत स्वस्त तेलाचा फायदा

नवी दिल्ली  - अमेरिकेत मंदीची शक्यता आणि चीनमधील सुस्त झालेल्या आर्थिक घडामाेडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत या आठवड्यात माेठी घसरण झाली आहे. वर्षभरात कच्च्या तेलाचे दर एकीकडे सुमारे २४ टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना मिळालेला नाही. भाव घटल्यामुळे तेल कंपन्यांचा नफा वाढणार आहे.

मात्र, सर्वसामान्य जनतेला पेट्राेल आणि डिझेलच्या दरकपातीचा फायदा मिळणार का, हा माेठा प्रश्नच आहे.जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ७० डाॅलर प्रति बॅरलपेक्षाही कमी झाले आहेत, तर ब्रेंड क्रूडदेखील ७३ डाॅलर प्रति बॅरलपर्यंत आले आहे. गेल्या ९ महिन्यांमधील ही नीचांकी पातळी आहे. मात्र, जनतेला दिलासा मिळालेला नाही. 

डिझेलची घटलेली मागणी ठरू शकते चिंतेचा विषय
औद्याेगिक क्षेत्रात डिझेलचा माेठ्या प्रमाणात वापर हाेताे. मात्र, चीन, आशिया व युराेपमध्ये डिझेलची मागणी घटली आहे.
भारतात मागणी २.४ टक्क्यांनी वाढली असली तरीही २०२२ आणि २०२३च्या अनुक्रमे १० आणि ६.७ टक्क्यांच्या तुलनेत कमीच आहे. 

- ९.३ रुपये प्रतिलीटर डिझेल आणि ७.६ रुपये प्रतिलीटर पेट्राेलवर नफा ऑगस्ट २०२४मध्ये कंपन्यांना हाेत हाेता.
- १३-१४ रुपये प्रतिलीटरपर्यंत हा नफा सध्याच्या घडीला असल्याचा अंदाज आहे.
- ८२,५०० काेटी रुपये एवढा नफा तेल कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात कमाविला. ताे ७१ पट जास्त हाेता. 

ब्रेंट क्रूडचे दर (डाॅलर प्रतिबॅरल)
    २९ सप्टेंबर २०२३    ९७.०१ 
    ७ डिसेंबर २०२३    ७४.५०
    ९ एप्रिल २०२४    ९०.६०
    ४ जून २०२४     ७७.५० 
    ४ जुलै २०२४    ८७.४०
    ४ सप्टेंबर २०२४    ७२.९१

Web Title: Petrol Expensive for Us, Nets Costly for Them, Companies Exploit Cheap Oil, Crude Oil Prices Fall 24 Percent in a Year, Expensive Oil for Commoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.