Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्राेल महाग: तरीही कंपन्या ताेट्यात, कसं काय? जाणून घ्या...

पेट्राेल महाग: तरीही कंपन्या ताेट्यात, कसं काय? जाणून घ्या...

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील पेट्राेलियम कंपन्यांना सलग दुसऱ्या तिमाहीत एकूण २ हजार ७४८ काेटी रुपयांचा ताेटा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 06:19 AM2022-11-09T06:19:38+5:302022-11-09T06:20:24+5:30

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील पेट्राेलियम कंपन्यांना सलग दुसऱ्या तिमाहीत एकूण २ हजार ७४८ काेटी रुपयांचा ताेटा झाला आहे.

Petrol is expensive still the companies are paying in loss how Find out here | पेट्राेल महाग: तरीही कंपन्या ताेट्यात, कसं काय? जाणून घ्या...

पेट्राेल महाग: तरीही कंपन्या ताेट्यात, कसं काय? जाणून घ्या...

नवी दिल्ली :

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील पेट्राेलियम कंपन्यांना सलग दुसऱ्या तिमाहीत एकूण २ हजार ७४८ काेटी रुपयांचा ताेटा झाला आहे. सहामाहीचा विचार केल्यास हा आकडा २१ हजार काेटींवर आहे.  

इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या कंपन्यांना पेट्राेल, डिझेल आणि घरगुती गॅस विक्रीतून चालू आर्थिक वर्षात माेठा ताेटा झाला आहे. तेल कंपन्यांनी गेल्या ७ महिन्यांपासून पेट्राेल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. सध्या ९५ ते ९७ डाॅलर्स या पातळीनुसार सध्या पेट्राेल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत तेल कंपन्यांना २२ हजार काेटींचा नफा झाला हाेता.
 

Web Title: Petrol is expensive still the companies are paying in loss how Find out here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.