Join us  

पेट्राेल महाग: तरीही कंपन्या ताेट्यात, कसं काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 6:19 AM

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील पेट्राेलियम कंपन्यांना सलग दुसऱ्या तिमाहीत एकूण २ हजार ७४८ काेटी रुपयांचा ताेटा झाला आहे.

नवी दिल्ली :

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील पेट्राेलियम कंपन्यांना सलग दुसऱ्या तिमाहीत एकूण २ हजार ७४८ काेटी रुपयांचा ताेटा झाला आहे. सहामाहीचा विचार केल्यास हा आकडा २१ हजार काेटींवर आहे.  

इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या कंपन्यांना पेट्राेल, डिझेल आणि घरगुती गॅस विक्रीतून चालू आर्थिक वर्षात माेठा ताेटा झाला आहे. तेल कंपन्यांनी गेल्या ७ महिन्यांपासून पेट्राेल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. सध्या ९५ ते ९७ डाॅलर्स या पातळीनुसार सध्या पेट्राेल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत तेल कंपन्यांना २२ हजार काेटींचा नफा झाला हाेता. 

टॅग्स :पेट्रोल