महाराष्ट्रात आता पेट्रोलच्या दरांनी १२० रुपयांची पातळी गाठली आहे. डिझेलही सर्वोच्च पातळीकडे कूच करू लागले आहे. जीएसटीने केंद्राची झोळी भरून ओतू लागली आहे. अशावेळी आपली झोळी रिकामी होत चालली आहे. तुम्हाला पेट्रोल २५ रुपयांपर्यंत स्वस्त मिळू शकते, यासाठी ही ट्रीक फ़ॉलो करावी लागेल.
तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरायला गेल्यावर तिथे बारकोड स्कॅन करण्यासाठी असतो. ती एक मोठी सोय झाली आहे. यामुळे एटीएम स्कॅमच्या घटना कमी झाल्या आहेत. तसेच हातात पुरेशी कॅशही ठेवावी लागत नाही. परंतू आणखी एक फायदा तो म्हणजे कॅशबॅकचा आहे. तुम्ही पेट्रोल पंपावर १०० रुपयांचे पेट्रोल भरले तर तुम्हाला २५ रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये असलेले एक अॅप उपयोगी पडणार आहे.
आजकाल पेटीएम प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असते. जर तुम्हाला पेट्रोल भरल्यानंतर कॅशबॅक हवा असेल तेव्हा तुम्ही पेटीएमचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला आयओसीएल म्हणजेच इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर जावे लागणार आहे. तिथे तुम्ही पेटीएमचा वापर करून पैसे अदा केले तर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक दिला जाईल. ही ऑफर कमीतकमी १०० रुपयांच्या ट्रान्झेक्शनसाठी आहे. हा कॅशबॅक तुम्ही एका महिन्यात चारवेळा मिळवू शकता.
या ऑफरमध्ये तुम्हाला २५ रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. हा कॅशबॅक तुम्हाला ४८ तासांत मिळेल. ही ऑफर केवळ काही निवडक आयओसीएलच्या पेट्रोल पंपांवर असेल. ही ऑफर तीन महिन्यांसाठी वैध आहे. या ऑफरमध्ये लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करावा लागणार आहे.