नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. गुरुवारी पेट्रोल १२ पैसे प्रति लिटर आणि डिझेल १८ पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. एक महिन्यात पेट्रोलच्या दरात २ रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. डिझेलच्या किंमतीही यावर्षी १० रुपयांनी वाढल्या आहेत.
तेलाच्या किंमतीबाबत यूपीए सरकारवर भाजपा सतत टीका करीत असे. पण मोदी यांचे सरकार आज काहीही कारणे सांगो, पण तेलाच्या या खेळात सरकार मालामाल होत आहे. लोकांना २०१२ च्या तुलनेत आज फार मोठी किंमत चुकवावी लागत आहे. सरकारच्या तिजोरीत कराद्वारे येणारा महसूल वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात २०१२ मध्ये तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०९.४५ डॉलर असताना दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी ६८.४८ व मुंबईत ७४.२३ रुपये मोजावे लागत होते. आज कच्च्या तेलाच्या किंमती ७० डॉलर प्रति बॅरल आहेत. पण, दिल्ली, मुंबईत पेट्रोलसाठी लोकांना अनुक्रमे ७८ व ८५ रुपये द्यावे लागत आहेत.
पेट्रोल-डिझेलसाठी जी रक्कम मोजावी लागत आहे, त्यापैकी निम्म्याहून अधिक रक्कम कराची आहे. दिल्लीत ७८ रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक किंमतीने विक्री होणाऱ्या पेट्रोलची बेस प्राइज ३८.२६ रुपये आहे. यावर केंद्रीय कर १९.४८ रुपये व राज्यांचा कर १६.५६ रुपये आणि डिलरचे ३.६१ रुपये कमिशन आहे. म्हणजेच ३८.२६ रुपये प्रति लिटर बेस प्राइजच्या पेट्रोलवर ३९.६५ रुपये जादा मोजावे लागतात. राज्ये व केंदाच्या्र सरकार तिजोºया फुगत असून, सामान्यांचा माणसांचा खिसा रिकामा होत आहे.महागाईने सामान्यांचा खिसा मात्र होत आहे रिकामावर्ष *कच्चे तेल दिल्ली (रु.) मुंबई (रु.)२९ आॅ. २०१८ ६९.९१ ७८.१८ ८५.६0जुलै २०१८ ६९.०२ ७५.५५ ८२.९४जुलै २०१७ ५२.५१ ६३.०९ ७४.३0जुलै २०१६ ४०.६८ ६४.७६ ६९.३२जुलै २०१५ ४९.४९ ६६.०१ ७४.५२जुलै २०१४ ९६.२९ ७३.६ ८१.७५जुलै २०१३ १०५.८७ ६८.५८ ७५.७९जुलै २०१२ १०९.४५ ६८.४८ ७४.२३