नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची वाढ झाल्यानंतर सोमवारी राजधानी दिल्ली आणि कोलकाता या प्रमुख महानगरांतही शंभरीच्या उंबरठ्यावर गेले. डिझेलचे दर मात्र जैसे थे राहिले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आजच्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ९९.९० रुपये लिटर, तर कोलकात्यात ९९.८८ रुपये लिटर झाले. पेट्रोलचा दर मुंबई १०५.९५ रुपये लिटर आणि चेन्नईत १००.७८ रुपये लिटर झाला. मागील दोन महिन्यांत पेट्रोल ३५ वेळा महागले. या काळात डिझेल ३४ वेळा महागले. तथापि, सोमवारी डिझेल ‘जैसे थे’ राहिले. डिझेलचे दर मुंबईत ९६.९१ रुपये, दिल्लीत ८९.३६ रुपये, चेन्नईत ९३.९४ रुपये आणि काेलकात्यात ९२.३१ रुपये लिटर राहिले. देशातील १४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार गेले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लदाख आणि सिक्किम यांचा त्यात समावेश आहे.
कोलकाता तसेच दिल्लीतही पेट्रोल शंभरीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 10:04 AM