नवी दिल्ली : मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग आठव्या दिवशी वाढ झाली. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ३० पैशांनी, तर डिझेलचे दर ३५ पैशांनी महागले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ झाल्यामुळे देशांतर्गत दर वाढले असल्याचे तेल वितरण कंपन्यांनी म्हटले आहे.
या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ८९.२९ रुपये लिटर, तर डिझेल ७९.७० रुपये लिटर झाले. मागील सात दिवसांत पेट्रोल २.३६ रुपयांनी, तर डिझेल २.९१ रुपयांनी
महागले.
देशभरात पेट्रोल २६ ते ३२ पैशांनी, तर डिझेल ३० ते ३५ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ९५.७५ रुपये लिटर झाले आहे. १०० रुपये
लिटर होण्यासाठी आता अवघे ४ रुपये बाकी आहेत. डिझेलचे
दर ८६.७२ रुपये लिटर झाले
आहेत.
डिझेलही आता ९० रुपयांच्या उंबरठ्यावर आहेत. दिल्ली वगळता देशातील इतर सर्वच महानगरांत पेट्रोल ९० रुपयांच्या वर, तर डिझेल ८० रुपयांच्या वर गेले आहे. प्रीमियम पेट्रोलचे दर महाराष्ट्र, १०० रुपयांच्या वर गेले आहेत.
तेल वितरण कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढून ६३.५ डॉलर प्रतिबॅरल झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत.
मंगळवारी एकाच दिवसात ते २ टक्क्यांनी वाढले. जाणकारांनी सांगितले की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने तेलाची मागणी पुन्हा घटू शकते. त्यामुळे किमती खाली येतील. २०२१ मध्ये देशातील पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल २१ वेळा वाढले आहेत. या वर्षात पेट्रोल ५.५८ रुपयांनी, तर डिझेल ५.८३ रुपयांनी महागले आहे.
इंधन दरात सलग आठव्या दिवशी वाढ, पेट्रोल ५.५८ तर डिझेल ५.८३ रुपयांनी महागले
petrol-diesel price : या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ८९.२९ रुपये लिटर, तर डिझेल ७९.७० रुपये लिटर झाले. मागील सात दिवसांत पेट्रोल २.३६ रुपयांनी, तर डिझेल २.९१ रुपयांनी महागले.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 07:05 AM2021-02-17T07:05:28+5:302021-02-17T07:06:12+5:30