नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel)वाढत्या दराने सर्वांचे जगणे कठीण करून टाकले आहे. महागाई प्रचंड वाढली असून, सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी इंधनावरील कर कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला, पण बहुतांशी ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीच्या जवळपास आहेत. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता तुम्हाला 68 लिटर पेट्रोल आणि डिझेल मोफत मिळण्याची संधी आहे. तुम्ही तुमचे पैसे कसे वाचवू शकता आणि 50 लिटर पेट्रोल मोफत कसे मिळवू शकता, याबद्दल जाणून घेऊया....
दरवर्षी 68 लिटर मोफत मिळेल इंधन
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल खरेदी करताना इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डने (Indian Oil Citi Credit Card) पेमेंट करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही दरवर्षी 68 लिटरपर्यंत पेट्रोल-डिझेल मोफत मिळवू शकता. इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्ड हे इंधन क्रेडिट कार्ड आहे. या कार्डचा वापर करून मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स (टर्बो पॉइंट्स) रिडीम करून ग्राहक दरवर्षी 68 लिटर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकतात.
इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डचे खास फीचर्स...
1. इंडियन ऑइल पंपांवर टर्बो पॉइंट्स रिडीम करून दरवर्षी 68 लीटर पर्यंत मिळवा मोफत इंधन .
2. इंडियन ऑइल पंपांवर 1 टक्के इंधन अधिभार माफ.
3. इंडियन ऑइल पंपांवर प्रति 150 रुपयांच्या खर्चावर मिळवा 4 टर्बो पॉइंट्स.
4. कार्डद्वारे किराणामाल आणि सुपरमार्केटमध्ये खर्च केलेल्या प्रति 150 रुपयांसाठी मिळवा 2 टर्बो पॉइंट्स.
5. कार्डद्वारे इतर कॅटगरीमध्ये 150 रुपयांच्या खर्चावर मिळवा 1 टर्बो पॉइंट.
टर्बो पॉइंट्सला कसे करावे रिडीम?
टर्बो पॉइंट्सला अनेक प्रकारे रिडीम केले जाऊ शकते परंतु इंडियन ऑइल पंपांवर रिडीम केल्याने जास्तीत जास्त फायदा मिळतो.
>> इंडियन ऑइल पंपांवर रिडमशन रेट– 1 टर्बो पॉइंट = 1 रुपये.
>> MakeMyTrip, EaseMyTrip, IndiGo, goibibo, IndiGo, Premiermiles.co.in आणि Yatra.com वर रिडीमशन रेट- 1 टर्बो प्वाइंट = 25 पैसे.
>> BookMyShow, Airtel, Jio, Vodafone आणि Shopper Stop वर रिडीमशन रेट- 1 टर्बो प्वाइंट = 30 पैसे.