Join us

पेट्रोल गेले ८२ रुपयांच्या पार, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 8:28 AM

दिल्लीत पेट्रोल 82 च्या पुढे गेले आहे, जो एक नवीन रेकॉर्ड आहे. दिल्लीत आज पेट्रोल 82.03 रुपये आणि डिझेल 73.56 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे.

जागतिक इंधन बाजारामध्ये काहीसं निराशाजनक वातावरण आहे, परंतु असे असूनही देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किमतीत जोरदार चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र, गेल्या 28 दिवसांपासून डिझेलच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. काल सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल किंवा डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केला नाही, पण आज पुन्हा पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. दिल्लीत पेट्रोल 82 च्या पुढे गेले आहे, जो एक नवीन रेकॉर्ड आहे. दिल्लीत आज पेट्रोल 82.03 रुपये आणि डिझेल 73.56 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे.अर्ध्या महिन्यात पेट्रोल 1.60 रुपयांनी महागले16 ऑगस्टपासून पेट्रोलच्या किमती भडकल्या आहेत, त्यातील वाढ अजूनही सुरूच आहे. दरम्यान, काही दिवस किमती वाढल्या नाहीत, अन्यथा दररोज वाढत होत्या. 16 ऑगस्टला दिल्लीत पेट्रोल 14 पैशांनी महागले होते. तेव्हापासून या पेट्रोल किंमत वाढीचा सिलसिला सुरूच आहे. त्यानंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.60 रुपयांनी महागले आहेत.गेल्या महिन्यात फक्त डिझेल महागले होतेगेल्या जुलैमध्ये पाहिले तर सरकारी तेल कंपन्यांनी फक्त डिझेलचे दर वाढवले होते. त्यावेळी डिझेलच्या किमतीत 10 हप्त्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आलीहोती. यात डिझेल प्रतिलिटर 1.60 रुपयांनी महाग झाले होते. या महिन्याचा पहिल्या पंधरवड्यात कोणतीही वाढ नाहीया महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील आकडेवारीवर नजर टाकली तर सरकारी तेल कंपन्यांनी एक दिवस वगळता किमती वाढवलेल्या नाहीत. गेल्या जुलैच्या दुस-या पंधरवड्यातही पेट्रोलच्या किमती स्थिर आणि डिझेलच्या किमती सलग 4 दिवस (28 जुलै ते 31 जुलै) पर्यंत कायम राहिल्या.आपल्या शहरातील आजचे भाव जाणून घ्यापेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील माहीत करत येतात.(दररोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासायची). इंडियन ऑइल ग्राहक आरएसपी लिहून 9224992249 वर मेसेज पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 वर आरएसपी लिहून मेसेज पाठवू शकतात. त्याच वेळी एचपीसीएल ग्राहकांना एचपी प्राइस लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

टॅग्स :पेट्रोलपेट्रोल पंप