Join us

पेट्रोल पंपावर 'या' पाच सुविधा मिळतात मोफत, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 1:26 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत होती. परंतु काही दिवस झाले पेट्रोलचे दर कमी होत आहेत.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत होती. परंतु काही दिवस झाले पेट्रोलचे दर कमी होत आहेत. पेट्रोल पंपावर वाहन चालक पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जातात. त्यासाठी त्यांना पैसेही मोजावे लागतात. पण पेट्रोल पंपावर अशाही काही सुविधा आहेत ज्या वाहनचालकांना मोफत मिळतात. या सुविधांबाबत सामान्यांना फारशी कल्पना नाही. पेट्रोलियम मंत्रालय आणि ऑइल कंपन्या याची वेळोवेळी माहिती देत असतात.तरीही काही लोकांना यासंदर्भात माहिती नसते. आम्ही तुम्हाला त्या पाच सुविधांबद्दल माहिती देणार आहोत. जर पेट्रोल पंपावर या सुविधा मोफत मिळत नसल्यास तुम्ही तक्रारही करू शकता. पेट्रोल पंपावर तुम्ही हवा मोफत भरू शकता. बरेच जण त्यासाठी पैसे मोजतात. परंतु तुम्हाला या सुविधेसाठी कोणतंही शुल्क देण्याची गरज नाही. तसेच एखाद्या वेळी तुमच्या फोनची बॅटरी संपली किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम झाल्यास तुम्ही पेट्रोल पंपावरून इमर्जन्सी कॉलही करू शकता.विशेष म्हणजे त्या फोनसाठी तुम्हाला कोणतंही शुल्क भरण्याची गरज नाही. ही सुविधाही एकदम मोफत आहे. उन्हामुळे बऱ्याचदा तहान लागते, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःबरोबर पाण्याची बॉटल बाळगू शकत नाही. अशातच तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत पाणी पिऊ शकता. त्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही. एखादी दुखापत झाल्यावरही पेट्रोल पंपावर तुम्ही तात्पुरती मलमपट्टी करू शकता. त्यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत. पेट्रोल पंपावर तुम्हाला फर्स्ट एड बॉक्सची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहेत. या फर्स्ट एड बॉक्समुळे तुम्ही जखमेवर तात्पुरती मलमपट्टी करू शकता. 

टॅग्स :पेट्रोल पंप