Join us

Petrol Diesel : पेट्रोलची विक्री वाढली, मात्र डिझेलची मागणी घटली; पाहा काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 8:53 AM

एप्रिलमध्ये देशात पेट्रोलचा वापर वाढला, तर डिझेलच्या विक्रीत घट सुरूच आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.

एप्रिलमध्ये देशात पेट्रोलचा वापर १२.३  टक्क्यांनी वाढला, तर डिझेलच्या विक्रीत घट सुरूच आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. इंधन बाजारपेठेत सुमारे ९० टक्के वाटा असलेल्या या पेट्रोलियम कंपन्यांची एकूण पेट्रोल विक्री एप्रिलमध्ये २९.७ लाख टन झाली, तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा वापर २६.५ लाख टन होता. 

गेल्या महिन्यात डिझेलची मागणी २.३ टक्क्यांनी घसरून ७० लाख टनांवर आली, तर मार्चमध्येही या इंधनाची मागणी २.७ टक्क्यांनी घटली होती. विशेषत: निवडणुकीच्या काळात डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दर कमी झाल्याने खासगी वाहनांचा वापर वाढल्याने पेट्रोलची विक्री वाढली आहे. 

भारतात सर्वाधिक डिझेलचा वापर 

  • दोन वर्षांत पहिल्यांदाच दरात बदल झाला. मासिक आधारावर पाहिल्यास, मार्चमधील २८.२ लाख टनांच्या तुलनेत एप्रिलमध्ये पेट्रोलची विक्री ५.३ टक्क्यांनी कमी झाली. पण, डिझेलच्या बाबतीत, मार्चमध्ये विक्री ६७ लाख टनांवरून ४.४ टक्क्यांनी वाढली आहे.  
  • डिझेल हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे इंधन आहे, जे वापरल्या जाणाऱ्या सर्व पेट्रोलियम उत्पादनांपैकी ४० टक्के आहे.
टॅग्स :पेट्रोलडिझेल