तालिबानींनी अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा सुरू आहेत. खासकरून पेट्रोल-डिझेलच्या किमतींवरून. असो. तो विषय वेगळा आहे. सध्या तरी पेट्रोल-डिझेलच्या मुद्यावरून देशात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत. विद्यमान सत्ताधारी भूतकाळातील सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवून इंधनाच्या किमती खाली आणू शकत नसल्याचे म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर इंधनस्वस्ताई असलेल्या सर्वोच्च दहा देशांची माहिती जाणून घेऊ या...
इंधनस्वस्ताई असलेले सर्वोच्च दहा देश
व्हेनेझुएला
१.४८ रुपये प्रतिलिटर
इराण
४.४५ रुपये प्रतिलिटर
अंगोला
१८.५६ रुपये प्रतिलिटर
अल्जिरिया
२५.२४ रुपये प्रतिलिटर
कुवेत
२५.९१ रुपये प्रतिलिटर
नायजेरिया
२९,८५ रुपये प्रतिलिटर (कोरोनाकाळात म्हणजेच एप्रिल, २०२० ते ऑगस्ट, २०२० या कालावधीत भारताने नायजेरियाकडून ७१ लाख टन कच्च्या तेलाची आयात केली होती.)
तुर्कस्तान
३१.८५ रुपये प्रतिलिटर
कझाकस्तान
३३.११ रुपये प्रतिलिटर
कतार
४२.८४ रुपये प्रतिलिटर
सुदान
५१.०८ रुपये प्रतिलिटर