तालिबानींनी अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा सुरू आहेत. खासकरून पेट्रोल-डिझेलच्या किमतींवरून. असो. तो विषय वेगळा आहे. सध्या तरी पेट्रोल-डिझेलच्या मुद्यावरून देशात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत. विद्यमान सत्ताधारी भूतकाळातील सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवून इंधनाच्या किमती खाली आणू शकत नसल्याचे म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर इंधनस्वस्ताई असलेल्या सर्वोच्च दहा देशांची माहिती जाणून घेऊ या...
इंधनस्वस्ताई असलेले सर्वोच्च दहा देशव्हेनेझुएला१.४८ रुपये प्रतिलिटरइराण४.४५ रुपये प्रतिलिटरअंगोला१८.५६ रुपये प्रतिलिटरअल्जिरिया२५.२४ रुपये प्रतिलिटरकुवेत २५.९१ रुपये प्रतिलिटरनायजेरिया२९,८५ रुपये प्रतिलिटर (कोरोनाकाळात म्हणजेच एप्रिल, २०२० ते ऑगस्ट, २०२० या कालावधीत भारताने नायजेरियाकडून ७१ लाख टन कच्च्या तेलाची आयात केली होती.)तुर्कस्तान३१.८५ रुपये प्रतिलिटरकझाकस्तान३३.११ रुपये प्रतिलिटरकतार४२.८४ रुपये प्रतिलिटरसुदान५१.०८ रुपये प्रतिलिटर