Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Diesel Price: तब्बल ४ महिन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात कपात; पेट्रोलचा भाव काय? पाहा

Petrol Diesel Price: तब्बल ४ महिन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात कपात; पेट्रोलचा भाव काय? पाहा

गेले सलग ३३ दिवस पेट्रोलचे दर स्थिर असून, चार महिन्यांनंतर डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी कपात करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 08:54 AM2021-08-19T08:54:06+5:302021-08-19T08:55:31+5:30

गेले सलग ३३ दिवस पेट्रोलचे दर स्थिर असून, चार महिन्यांनंतर डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी कपात करण्यात आली आहे.

petrol unchanged last 33 days again diesel price reduced by 20 paise know latest fuel rates in india | Petrol Diesel Price: तब्बल ४ महिन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात कपात; पेट्रोलचा भाव काय? पाहा

Petrol Diesel Price: तब्बल ४ महिन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात कपात; पेट्रोलचा भाव काय? पाहा

Highlightsगेले सलग ३३ दिवस पेट्रोलचे दर स्थिरचार महिन्यांनंतर डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी कपातदेशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर

मुंबई: तब्बल एक महिन्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. १७ जुलैपासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नव्हता. मात्र, आज (गुरुवारी) पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. तर, डिझेलच्या दरात कपात केली आहे. गेले सलग ३३ दिवस पेट्रोलचे दर स्थिर असून, चार महिन्यांनंतर डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी २० पैशांची कपात करण्यात आली आहे. (petrol unchanged from last 33 days again diesel price reduced by 20 paise know latest fuel rates in india)

TATA ग्रुप आता ‘ही’ सरकारी कंपनी खरेदी करण्यास इच्छुक; केंद्राने दिली तत्त्वतः मंजुरी!

मे महिन्यात इंधन दरात प्रचंड वाढ झाली होती. सलग ४२ वेळा झालेल्या दरवाढीने पेट्रोल ११.५२ रुपयांनी महागले होते. तर ४१ वेळा दरवाढीनंतर डिझेलमध्ये ९.०८ रुपयांची वाढ झाली होती. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या भावात घसरण झाली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ६६.५९ डॉलरवर बंद झाला. त्यात ०.७० डॉलरची घसरण झाली. तर ब्रेंट क्रूडचा भाव ६९.०३ डॉलरवर स्थिरावला. त्यात ०.४८ डॉलरची घसरण झाली होती.

Adani ग्रुपचा आता राज्याच्या व्यापारी मार्गावरही ताबा; ‘या’ कंपनीशी १६८० कोटींचा व्यवहार

पेट्रोलचे दर जैसे थे

गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.४७ रुपये इतका आहे. तामिळनाडूने पेट्रोलवरील शुल्क ३ रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे आताच्या घडीला चेन्नईत सर्वांत कमी दरात पेट्रोल मिळत आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

Tata ने रचला इतिहास; TCS चे बाजारमूल्य १३ लाख कोटींवर, Reliance च्या काहीच पाऊल दूर!

डिझेलच्या दरात पुन्हा २० पैशांची कपात

पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी २० पैशांची कपात केल्यानंतर मुंबईत डिझेलचा दर ९७.०४ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.४७ रुपये आहे. चेन्नईत ९४.०२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा दर ९२.५७ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.२६ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९४.८६ रुपये आहे. 

EPFO मध्ये कोट्यवधींची फसवणूक; ८१७  खात्यांत गैरव्यवहार, पटापट तपासा बॅलन्स

दरम्यान, देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर असून, देशात भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नव्हती. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही १०० रुपये प्रति लीटरपर्यंत गेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. 
 

Web Title: petrol unchanged last 33 days again diesel price reduced by 20 paise know latest fuel rates in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.