नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे (Petrol-Diesel Price) सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Petroleum minister Hardeep Singh Puri) यांनी एक मोठी माहिती दिली आहे.
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक देश आहे. अशा परिस्थितीत भारतात लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. जिथे स्वस्त दरात तेल मिळेल, तिथूनच खरेदी करू, असे हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. याबाबत इंडिया एनर्जी वीकमध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी माहिती दिली होती. यासोबतच ते म्हणाले की, भारताच्या ऊर्जा सुरक्षेसोबतच नागरिकांना स्वस्त पेट्रोल उपलब्ध व्हावे, याची काळजी घ्यावी लागेल. तसेच जागतिक ऊर्जा परिवर्तनमध्ये भारताच्या भूमिकेसाठी पंतप्रधानांची दीर्घकालीन दृष्टी प्रतिबिंबित करते.
किती आयात केली जाते?
यासोबतच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, देश आपल्या 85 टक्के तेलाच्या गरजा आणि 50 टक्के नैसर्गिक वायू आयातीद्वारे भागवतो. याचबरोबर ऊस आणि इतर शेतीतून मिळणारे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात आहे, जेणेकरून आयातीवरील निर्भरता कमी होईल. सध्या त्याची देशात मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे.
2025 पर्यंत 20 टक्के मिळेल इथेनॉल
इतर देशांवरील निर्भरता कमी करण्यासाठी आयात केली जात आहे. यासोबतच 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासोबतच हरित ऊर्जेच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्याची योजना असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.
पीएम मोदींनी केले उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया एनर्जी वीकचे उद्घाटन केले. यावेळी भारत ऊर्जा क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. या क्षेत्रात अनेक अंदाज वर्तविले जात आहेत. कोरोना महामारीनंतरही देशात अनेक प्रकारच्या सुविधा पाहायला मिळ त आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
भारत 39 देशांकडून आयात करतो तेल
सध्या भारत तेल खरेदीच्या बाबतीत आपल्या मोठ्या बाजारपेठेचा वापर करत आहे. आम्ही मार्केट कार्ड वापरत करत आहोत. यासोबतच जिथे कमी दरात तेल मिळेल, तिथूनच आयात करू, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. दरम्यान, 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून तेल आयात करत होता. त्याचवेळी, 2021-22 मध्ये ही संख्या 39 पर्यंत वाढली आहे. सध्या भारत 39 देशांकडून तेल आयात करत आहे. त्यात कोलंबिया, रशिया, लिबिया, गॅबॉन आणि इक्वेटोरियल गिनी यांचाही समावेश आहे. यासह रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे.