बंगळुरू : डिजिटल वॉलेट कंपनी पेटीएमने क्रेडिट कार्डावरून पेटीएमवर पैसे टाकण्यावर आता २ टक्के शुल्क लावले आहे. अनेक ग्राहक आपल्या क्रेडिट कार्डावरून पेटीएमवर पैसे वळते करायचे, त्याबदल्यात मोफत क्रेडिट मिळवून पैसे पुन्हा क्रेडिट कार्डवर घ्यायचे. ते टाळण्यासाठी पेटीएमने हे शुल्क लावले आहे.वॉलेटमध्ये पैसे टाकण्यास क्रेडिट कार्डांचा वापर करणाऱ्यास ग्राहकास तेवढीच रक्कम कॅशबॅक म्हणून पेटीएम देणार आहे. नेटबँकिंग आणि डेबिट कार्डावरून वॉलेटवर पैसे टाकण्यावर मात्र कुठलेली शुल्क नाही. पेटीएमने म्हटले की, लोक जेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करतात तेव्हा पेटीएमला शुल्क अदा करावे लागते. लोक आमच्या वॉलेटमध्ये पैसे टाकून पुन्हा परत घेत असतील, तर आम्हाला पैसे गमवावे लागतात. लोकांनी वॉलेट बॅलन्समधून सेवा आणि उत्पादने विकत घेण्यासाठी पैसा वापरला तरच पेटीएमला पैसे मिळतात. (वृत्तसंस्था)
‘पेटीएम’चे नवे शुल्क
By admin | Published: March 10, 2017 12:59 AM