Join us

नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर! EPFO ​​बाबत मोठी अपडेट, लगेच तुमचे खाते तपासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 5:54 PM

नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. EPFO ने कर्मचाऱ्यांना मोठी अपडेट दिली आहे. लवकरच तुमच्या खात्यावर पीएफ वरील व्याज जमा होणार आहे.

नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. EPFO ने कर्मचाऱ्यांना मोठी अपडेट दिली आहे. लवकरच तुमच्या खात्यावर पीएफ वरील व्याज जमा होणार आहे. आर्थिक वर्ष २०२२ चे व्याज खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण, अजुनही खात्यावर स्टेटमेंट दाखवले जात नाही. यावर सरकारने सॉफ्टवेअर अपडेट होत असल्याचे सांगितले आहे. काही दिवसातच तुमच्या खात्यावर व्याज जमा झालेले दिसेल, असंही सांगण्यात आले आहे.  

केंद्र सरकारकडून पीएफवर ८.१ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. हे व्याजदर गेल्या ४० वर्षांतील सर्वात कमी आहे. यापूर्वी १९७७-७८ मध्ये ८ टक्के दराने व्याज दिले जात होते.

तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस कॉल देऊन व्याजाची रक्कम देखील तपासू शकता. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर तुमच्या नंबरवर व्याजाचे सर्व तपशील येतील.

तसेच तुम्ही अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर देखील पाहू शकता. या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर जावे लागेल. आता येथे तुम्हाला तुमचे युजरनेम (UAN नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल. यानंतर तुम्हाला सर्व तपशील मिळतील.

PAN-Aadhaar Card : पॅन-आधार कार्डबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या, अन्यथा...

उमंग अॅपद्वारे तुम्ही पीएफच्या व्याजाची रक्कमही तपासू शकता. हे अॅप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. यावर पासबुक वर क्लिक करा. यासह तुम्ही तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड (OTP) क्रमांक भरा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. यानंतर तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स पाहू शकता.

टॅग्स :कर्मचारी