PF Advance Withdrawal: सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा बचतीचा एक मुख्य स्त्रोत आहे. ज्यामध्ये मूळ पगारातील काहीशी रक्कम दरमहा कर्मचाऱ्यांच्या पीएफ निधीत जमा केली जाते. यानंतर, तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर वार्षिक आधारावर व्याज मिळते. परंतु पीएफ खातेधारक गरज पडल्यास आपल्या खात्यात जमा केलेली रक्कम सहज काढू शकतो का? तसेच, नवीन घर घेत असेल तर पीएफचे पैसे काढू शकतो का? यासंबंधी सविस्तर जाणून घ्या...
ईपीएफओ सदस्य मालमत्ता खरेदी करण्यासाठी पीएफ फंडातून आगाऊ पैसे काढू शकतात. मात्र, ज्या ईपीएफ सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाची ५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. यासोबतच खात्यात व्याजासह किमान एक हजार रुपये असले पाहिजेत. या ॲडव्हान्स अंतर्गत खात्यातून पैसे काढता येतात. जर तुम्ही नवीन घर किंवा जमीन खरेदी करत असाल तर तुम्हाला डीएसह २४ महिन्यांचा पगार मिळू शकतो किंवा ईपीएफ खात्यामध्ये जमा केलेली व्याजासह एकूण रक्कम आणि प्लांटची मूळ किंमत यापैकी जी कमी असेल ती मिळू शकते.
दरम्यान, जर तुम्ही पाच वर्षांपासून काम करत असाल आणि सलग पाच वर्षांपासून ईपीएफओ खात्यात योगदान देत असाल तर तुम्ही काही अटींसह ईपीएफओमधून आंशिक पैसे काढू शकता. तुम्हाला जमीन किंवा घर खरेदी करण्यासाठी पीएफमधून पैसे काढायचे असल्यास, तुम्ही मासिक पगाराच्या २४ पट आणि घर खरेदी आणि बांधण्यासाठी, तुम्ही मासिक पगाराच्या ३६ पट पर्यंत काढू शकता. याचबरोबर, जर तुम्हाला घराची दुरुस्ती करायची असेल, तर मासिक पगाराच्या १२ पट रक्कम काढता येईल. तसेच, तुम्ही तुमचे आणि तुमच्या नियोक्त्याचे योगदान आणि व्याजाची रक्कम देखील काढू शकता.