Lokmat Money > बिझनेस न्यूज > PF Balance चेक करणे आता झाले सोपे, अशाप्रकारे पाहू शकता....

PF Balance चेक करणे आता झाले सोपे, अशाप्रकारे पाहू शकता....

pf balance check : अनेक ईपीएफ सदस्यांना आपला पीएफ बॅलन्स (PF Balance) कशाप्रकारे चेक करायचा, याबाबत माहिती नसते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 08:00 PM2022-12-04T20:00:42+5:302022-12-04T20:02:58+5:30

pf balance check : अनेक ईपीएफ सदस्यांना आपला पीएफ बॅलन्स (PF Balance) कशाप्रकारे चेक करायचा, याबाबत माहिती नसते.

pf balance check online employee process provident fund money | PF Balance चेक करणे आता झाले सोपे, अशाप्रकारे पाहू शकता....

PF Balance चेक करणे आता झाले सोपे, अशाप्रकारे पाहू शकता....

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) एक बचतीचे साधन म्हणून काम करते. कर्मचारी आणि नियोक्ते बचतीसाठी समान प्रमाणात निधीचे योगदान देतात, जे सेवानिवृत्तीनंतर किंवा नोकरी बदलल्यानंतर मिळू शकते. 1 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीसाठी EPF योगदानावर लागू होणारा व्याज दर 8.1 टक्के आहे. दरम्यान, अनेक ईपीएफ सदस्यांना आपला पीएफ बॅलन्स (PF Balance) कशाप्रकारे चेक करायचा, याबाबत माहिती नसते. अशा परिस्थितीत आज आम्ही पीएफ बॅलन्स तपासण्याच्या पद्धतीबद्दल सांगणार आहोत.

UAN
पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी, तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) नियोक्त्याने अॅक्टिव्ह केला असल्याची खात्री केली पाहिजे. युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा ईपीएफ योजनेअंतर्गत नोंदणीकृत सर्व कर्मचाऱ्यांना प्रदान केलेला एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे. सर्व कर्मचार्‍यांकडे त्यांच्या कामाच्या जीवनादरम्यान फक्त एकच युनिव्हर्सल अकाउंट नंबर असणे आवश्यक आहे, त्यांनी कंपनी बदलली तरीही.

EPF Service
युनिव्हर्सल अकाउंट नंबर महत्त्वाचा आहे, कारण ईपीएफ सेवांशी संबंधित संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन केली जाते. युनिव्हर्सल अकाउंट नंबरद्वारे पीएफ अकाउंटच्या सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी, जसे की पैसे काढणे, पीएफ बॅलन्स तपासणे आणि पीएफ कर्जासाठी अर्ज करणे सोपे आहे. तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर क्रमांक अॅक्टिव्ह असेल तर तुम्ही पीएफ बॅलन्स तपासू शकता.

PF Balance Check
- सर्वात पहिल्यांदा ईपीएफओ पोर्टलवर जा.
- यानंतर Our Services या टॅबवर जा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून For Employees ऑप्शन निवडा.
- आता Services अंतर्गत Member passbook ऑप्शनवर क्लिक करा.
- एक लॉगिन पेज दिसेल. अॅक्टिव्हेट झाल्यानंतर येथे तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि पासवर्ड टाका.
- यानंतर 'Member ID' सिलेक्ट करा आणि View Passbook वर क्लिक करा.
- तुमचो पीएफ डिटेल्स स्क्रीनवर दिसेल.
- तसेच, तुम्ही Download Passbook ऑप्शनवर क्लिक करून प्रिंट काढू शकता.

Web Title: pf balance check online employee process provident fund money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.