Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएफची माहिती ‘डिजिलॉकर’वरही, यूएएन कार्ड, पेन्शन ऑर्डर, सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार

पीएफची माहिती ‘डिजिलॉकर’वरही, यूएएन कार्ड, पेन्शन ऑर्डर, सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार

PF information: कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना डिजिलॉकर सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा ईपीएफओने केली असून, या सुविधेवरून सदस्य आता यूएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) आणि स्कीम सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 10:14 AM2022-08-31T10:14:43+5:302022-08-31T10:15:50+5:30

PF information: कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना डिजिलॉकर सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा ईपीएफओने केली असून, या सुविधेवरून सदस्य आता यूएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) आणि स्कीम सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतील.

PF information, UAN card, pension order, certificate can also be downloaded on 'DigiLocker' | पीएफची माहिती ‘डिजिलॉकर’वरही, यूएएन कार्ड, पेन्शन ऑर्डर, सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार

पीएफची माहिती ‘डिजिलॉकर’वरही, यूएएन कार्ड, पेन्शन ऑर्डर, सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना डिजिलॉकर सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा ईपीएफओने केली असून, या सुविधेवरून सदस्य आता यूएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) आणि स्कीम सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतील.
 ईपीएफओशी सर्व दस्तऐवज आता डिजिलॉकरवरून डाउनलोड करता येतील. त्यात यूएएन कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर व स्कीम सर्टिफिकेट यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
नोकरदारांसाठी यूएएन महत्त्वपूर्ण
नोकरदारांसाठी यूएएन अत्यंत आवश्यक दस्तऐवज आहे. 
त्यातून कर्मचारी अनेक कंपन्यांतील आपल्या ईपीएफओ खात्यांवर नजर ठेवू शकतो. 

काय आहे डिजिलॉकर?
n डिजिलॉकर सुविधा ही ‘डिजिटल इंडिया प्रोग्राम’अंतर्गत सुरू करण्यात आलेली ऑनलाइन सुविधा आहे. 
n इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाअंतर्गत ही सुविधा कार्यरत आहे. त्याद्वारे नागरिकांना ‘डिजिटल डाक्युमेंट वॉलेट’ उपलब्ध करून दिले आहे. 
n अस्सल डिजिटल दस्तऐवज नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचे ‘डिजिटल सबलीकरण’ करणे यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

ईपीएस सर्टिफिकेट...
ईपीएस सर्टिफिकेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवेचा संपूर्ण तपशील असतो. याशिवाय कर्मचाऱ्याचा सेवा कालावधी, कौटुंबिक तपशील, तसेच कर्मचाऱ्याच्या माघारी कोणाला पेन्शन मिळावी याचा तपशील असतो.
काय आहे ईपीएफओ?
१५ नोव्हेंबर १९५१ रोजी एका अध्यादेशाद्वारे ईपीएफओची स्थापना केली होती. १९५२ मध्ये कर्मचारी भविष्य निधी कायदा आणण्यात आला. ईपीएफओद्वारे काँट्रीब्युटरी प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन योजना आणि संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना चालविली जाते.

Web Title: PF information, UAN card, pension order, certificate can also be downloaded on 'DigiLocker'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.