Join us

PF New Rules: मोठी बातमी! 1 एप्रिलपासून PF खात्यावरही लागणार टॅक्स, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 8:10 PM

PF New Rules : आता पीएफ खात्यावरही कर लागणार आहे. तुमच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यावर जमा होतो. पण आता पीएफच्या नियमांमध्ये काही नवे बदल होणार आहेत.

नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही देखील कर्मचारी असाल तर तुमचे कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ​​मध्ये (Employees’ Provident Fund Organization) खाते नक्कीच असेल. दरम्यान, आता पीएफ खात्यावरही कर लागणार आहे. तुमच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यावर जमा होतो. पण आता पीएफच्या नियमांमध्ये काही नवे बदल होणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून सध्याची पीएफ खाते दोन भागात विभागले जाण्याची शक्यता आहे.

'या' पीएफ खात्यावर लागेल करगेल्या वर्षी सरकारने नवीन आयकर नियम अधिसूचित केले होते. आता या अंतर्गत पीएफ खाती दोन भागात विभागली जातील. यामध्ये केंद्राला वर्षाला अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त एंप्लॉयी कॉन्ट्रिब्यूशन (Employee Contributions) असल्यास पीएफ उत्पन्नावर कर आकारला जाईल. दरम्यान, नवीन नियमांचा उद्देश उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना सरकारी कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यापासून रोखणे हा आहे.

पीएफ नियमांचे मुख्य मुद्द्ये...- सध्याच्या पीएफ अकाऊंट्सला करपात्र आणि करपात्र नसलेल्या कॉन्ट्रिब्युशन खात्यामध्ये विभागली जातील.- करपात्र नसलेल्या खात्यामध्ये त्यांचे क्लोजिंग अकाऊंट देखील समाविष्ट असेल, कारण त्याची तारीख 31 मार्च 2021 आहे.- नवीन पीएफ नियम पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2022 पासून लागू केले जाऊ शकतात.- वार्षिक ₹ 2.5 लाखांपेक्षा जास्त एंप्लॉयी कॉन्ट्रिब्यूशनतून पीएफ उत्पन्नावर नवीन कर लागू करण्यासाठी आयटी नियमांतर्गत नवीन कलम 9D समाविष्ट करण्यात आले आहे.- करपात्र व्याजाच्या गणनेसाठी सध्याच्या पीएफ खात्यामध्ये दोन वेगवेगळी अकाऊंट देखील तयार केली जातील.

या करदात्यांची फटका बसणार नाहीदरम्यान, हा नवीन नियम लागू झाल्यानंतर, बहुतेक पीएफ ग्राहकांना 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेचा फायदा होईल. मात्र लहान आणि मध्यमवर्गीय करदात्यांना या नव्या नियमाचा फटका बसणार नाही. याचा प्रामुख्याने उच्च उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. म्हणजेच तुमचा पगार कमी किंवा सरासरी असेल, तर तुम्हाला या नवीन नियमात काहीही फरक पडणार नाही.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीकर्मचारीपैसा