Join us

Gratuity Transfer: आनंदाची बातमी! नोकरी बदलल्यास आता 'पीएफ'प्रमाणे 'ग्रॅच्युएटी'ही ट्रान्सफर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 6:24 PM

Gratuity Transfer: भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ प्रमाणेच आता एक नोकरी सोडून दुसरी नोकरी सुरू केल्यास ग्रॅच्युएटी देखील ट्रान्सफर करता येणार आहे.

नोकरदार वर्गासाठी खूप आनंदाची बातमी आहे. भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ प्रमाणेच आता एक नोकरी सोडून दुसरी नोकरी सुरू केल्यास ग्रॅच्युएटी देखील ट्रान्सफर करता येणार आहे. EPF खातं जसं एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर केलं जातं. त्याच पद्धतीनं नोकरदाराच्या ग्रच्युएटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेऊन नियम लागू करण्यात येईल, असं केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. (Like PF Now Gratuity Can Be Transferred If You Change Job)

'ग्रॅच्युएटी'च्या रचनेतही होणार बदलसध्याच्या ग्रॅच्युएटीच्या रचनेत बदल करण्याबाबतही केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. यात केंद्र सरकार, कर्मचारी संघटना आणि उद्योग यांच्यातील ग्रॅच्युएटीच्या रचनेत बदल होणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, ग्रॅज्युएटीला सिटीसीचा एक आवश्यक भाग बनविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आणि यासाठी पुढील महिन्यात याबाबत अधिसूचना देखील प्रसिद्ध केली जाऊ शकते. 

सध्या एका वर्षांच्या नोकरीवर १५ दिवसांच्या पगाराइतकी ग्रॅच्युएटी मिळते. त्यात वाढ होऊन ३० दिवसांच्या पगारा इतकी ग्रच्युएटी करण्यात यावी अशी मागणी आहे. पण उद्योगांना हे मान्य नाही.  

कुणाला मिळतो ग्रॅच्युएटीचा लाभ?पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी अॅक्ट १९७२ नुसार ज्या कंपनीत एखादा कर्मचारी १० वर्षांपेक्षा अधिक वर्ष काम करतो, त्या प्रत्येकाला संस्थेमध्ये ग्रॅज्युएटीचा लाभ मिळवता येतो. जर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली किंवा सोडली, निवृत्त झाला तर ग्रॅज्युएटीचे नियम पूर्ण केले असतील तर ग्रॅज्युएटीचा लाभ मिळतो.  

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीव्यवसायकर्मचारीकेंद्र सरकार