Join us

पीएफच्या व्याजदरात कपात करणार नाही

By admin | Published: February 20, 2016 2:44 AM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी चालू वित्तीय वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या ८.८ टक्के या हंगामी व्याजदरात कोणतीही कपात केली जाणार नाही

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी चालू वित्तीय वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या ८.८ टक्के या हंगामी व्याजदरात कोणतीही कपात केली जाणार नाही, असे कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी स्पष्ट केले.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, व्याजदरात दुरुस्ती करताना देशाची आर्थिक परिस्थिती, विविध योजनांवरील व्याजदर आणि सातवा वेतन आयोग ध्यानात घेतला जाईल. देशाच्या एकूणच आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊनच अंतरिम व्याजदर जाहीर करण्यात आला आहे.त्यानंतर पुन्हा बैठक घेऊन तसाच आढावा घेतला जाईल. त्यात व्याजदराचा अंतिम निर्णय घेतला जाईल. कामगार संघटनांनी ९ टक्के व्याजदराची मागणी केली होती, पण इतका व्याजदर दिल्यास भविष्य निर्वाह निधीला १०२ कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. ईपीएफओचे अंदाजे उत्पन्न ३४८४४ कोटी रुपये आहे. ईपीएफओच्या सल्लागार समितीने ८.९५ टक्के व्याजदराची शिफारस केली होती.