Join us

पीएफ विड्रॉल आॅनलाईन होणार

By admin | Published: October 16, 2015 10:24 PM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढायचे असतील तर कागदी घोडे नाचविण्याचे काम आता लवकरच इतिहासजमा होणार आहे

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढायचे असतील तर कागदी घोडे नाचविण्याचे काम आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत पीएफच्या आपल्या खात्यातून आॅनलाईन पैसे काढून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न भविष्य निर्वाह निधी संघटना करीत आहे.भविष्य निर्वाह निधीसह शासकीय योजनांच्या लाभासाठी ‘आधार’ कार्डचा वापर ऐच्छिक करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर आता पीएफचे पैसे आॅनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार पीएफ संघटनेतर्फे केला जात आहे. भविष्य निर्वाह निधीचे सध्या पाच कोटी ग्राहक आहेत. एखादा अर्ज आल्यानंतर तीन तासांच्या आत आॅनलाईनद्वारे त्याचा निपटारा झाला पाहिजे. या दृष्टीने ही संघटना प्रयत्नशील आहे. एकदा याबाबतची यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर ग्राहक आॅनलाईन अर्ज दाखल करू शकतील आणि त्यांनी मागितलेली रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. आॅनलाईन विड्रॉलसाठी आम्ही श्रममंत्रालयाला पत्र लिहिले आहे.