Lokmat Money > बिझनेस न्यूज > MBA करूनही मिळाली नाही नोकरी, रद्दीचा ढीग बघून आली आयडिया; महिलेनं ₹1 लाखात उभी केली 800 कोटींची कंपनी

MBA करूनही मिळाली नाही नोकरी, रद्दीचा ढीग बघून आली आयडिया; महिलेनं ₹1 लाखात उभी केली 800 कोटींची कंपनी

नेमकी काय होती त्यांना सुचलेली आयडिया आणि कशा बनल्या यशस्वी उद्योजक? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:12 AM2023-11-06T11:12:39+5:302023-11-06T11:14:05+5:30

नेमकी काय होती त्यांना सुचलेली आयडिया आणि कशा बनल्या यशस्वी उद्योजक? 

pg paper owner poonam gupta success story started a company worth 800 crores with rs 1 lakh know abput her waste paper recycling business | MBA करूनही मिळाली नाही नोकरी, रद्दीचा ढीग बघून आली आयडिया; महिलेनं ₹1 लाखात उभी केली 800 कोटींची कंपनी

MBA करूनही मिळाली नाही नोकरी, रद्दीचा ढीग बघून आली आयडिया; महिलेनं ₹1 लाखात उभी केली 800 कोटींची कंपनी

इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी असे, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. उद्योग क्षेत्रात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी अगदी छोट्याशा सुरुवातीपासून आपले औद्योगिक साम्राज्य उभे केले आहे. असेच एक नाव म्हणजे, पूनम गुप्ता (Poonam Gupta Businesswoman). पूनम यांना रद्दी खरेदीची कल्पना सुचली आणि आज त्या तब्बल 800 कोटी रुपयांचे बाजारमुल्य असलेल्या कंपनीच्या मालक आहेत. तर, जाणून घेऊयात, नेमकी काय होती त्यांना सुचलेली आयडिया आणि कशा बनल्या यशस्वी उद्योजक? 

दिल्ली ते स्कॉटलँड -
महिला उद्योगपती पूनम गुप्ता या मुळच्या दिल्लीतील आहेत. त्यांनी येथील लेडी श्रीराम कॉलेजमधून इकोनॉमिक्समध्ये ऑनर्स केले आहे. यानंतर एमबीए केल्यानंतर त्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली. मात्र त्यांना कुठेही यश मिळाले नाही. यानंतर 2002 मध्ये त्यांचे लग्न पुनित गुप्ता यांच्यासोबत झाले. ते स्कॉटलँडमध्ये नोकरी करतात. लग्नानंतर पूनमही स्कॉटलँडमध्ये गेल्या आणि त्यांनी तेथेही नोकरी शोधली. मात्र अनुभव नसल्याने त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. यातच त्यांना उद्योगासंदर्भात एक आयडिया आली.

ऑफिसमधील रद्दीचा ढीग बघू आली आयडिया -
पूनम गुप्ता नोकरीच्या शोधात फीरत असनाना त्यांना अनेक कार्यालयांमध्ये रद्दीचे ढीग दिसले. यानंतर त्यांनी त्यावर संशोधन सुरू केले आणि त्यांच्या डोक्यात या रद्दीचे रिसायकलिंग करून नव्या वस्तू तयार करण्यावर स्वतःला फोकस केले. याच वेळी त्यांना स्कॉटलंड सरकारच्या योजनेअंतर्गत 1,00,000 रुपयांचा निधीही मिळाला आणि या निधीतून पूनम गुप्ता यांनी नोकरीऐवजी स्वतःचा रद्दीचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.

1 लाख ते 800 कोटी रुपयांचा उद्योग -  
गेल्या 20 वर्षांपूर्वी अर्थात 2003 मध्ये पूनम गुप्ता यांनी सरकारकडून मिळालेल्या 1 लाख रुपयांच्या सहाय्याने PG Paper नावाने रद्दीचे रिसायक करण्याचा स्वतःचा बिझनेस सुरू केला. रद्दी पेपेर विकत घेणे, त्याचे रिसायकलिंग करून चांगल्या दर्जाचा पेपर तयार करणे आणि तो सप्लाय करणे असा हा बिझनेस. केवळ 1 लाख रुपयांपासून सुरू करण्यात आलेला हा बिझनेस आज 800 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

पूनम यांचा हा उद्योग युरोपपासून अमेरिकेपर्यंत पसरला आहे. मोठ मोठ्या कंपन्यांसोबत पीजी पेपरचा काँट्रॅक्ट आहे येथून पेपर स्क्रॅप खरेदी केले जाते. माध्यमांतील वृत्तांनुसार, PG Paper चा उद्योग जगातील जवळपास 60 देशांमध्ये पसललेला आहे.
 

Web Title: pg paper owner poonam gupta success story started a company worth 800 crores with rs 1 lakh know abput her waste paper recycling business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.