Lokmat Money > बिझनेस न्यूज > फिलिप्समध्ये पुन्हा ६००० जणांची नोकरी गेली, तीनच महिन्यांआधी ४ हजार जणांना काढलेलं!

फिलिप्समध्ये पुन्हा ६००० जणांची नोकरी गेली, तीनच महिन्यांआधी ४ हजार जणांना काढलेलं!

डच वैद्यकीय तंत्रज्ञान निर्माता फिलिप्सने सोमवारी मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीला झालेल्या नुकसानीमुळे जगभरातील ६ हजार नोकऱ्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 02:40 PM2023-01-30T14:40:01+5:302023-01-30T14:40:45+5:30

डच वैद्यकीय तंत्रज्ञान निर्माता फिलिप्सने सोमवारी मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीला झालेल्या नुकसानीमुळे जगभरातील ६ हजार नोकऱ्या ...

philips cuts more 6000 jobs just months after laying off 4000 employees | फिलिप्समध्ये पुन्हा ६००० जणांची नोकरी गेली, तीनच महिन्यांआधी ४ हजार जणांना काढलेलं!

फिलिप्समध्ये पुन्हा ६००० जणांची नोकरी गेली, तीनच महिन्यांआधी ४ हजार जणांना काढलेलं!

डच वैद्यकीय तंत्रज्ञान निर्माता फिलिप्सने सोमवारी मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीला झालेल्या नुकसानीमुळे जगभरातील ६ हजार नोकऱ्या कमी होतील, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीनं सुमारे तीन महिन्यांपूर्वी ४००० नोकऱ्या कपातीची घोषणा केली होती, त्यानंतर कंपनीकडून ही दुसरी सर्वात मोठी कर्मचारी कपातीची घोषणा आहे. कंपनी २०२५ पर्यंत या कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे, अशी माहिती कंपनीचे सीईओ रॉय जेकब्स यांनी दिली. 

"फिलिप्स आणि आमच्या भागधारकांसाठी २०२२ हे वर्ष खूप कठीण आहे, कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी आणि कामगिरी सुधारण्यासाठी आवश्यक निर्णय घेणं गरजेचं आहे. अॅमस्टरडॅम-आधारित फर्मने २०२२ च्या चौथ्या तिमाहीत १०५ दशलक्ष युरो (११४ दशलक्ष डॉलर) आणि मागील वर्षासाठी १.६ अब्ज युरोचा निव्वळ तोटा नोंदवला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रिकॉल करावे लागले. फिलिप्सने २०२१ मध्ये स्लीप एपनियाने ग्रस्त असलेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या डिव्हाइसेसना मोठ्या प्रमाणावर परत मागवण्याची घोषणा केली", असं कंपनीचे सीईओ जेकब्स यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. 

Web Title: philips cuts more 6000 jobs just months after laying off 4000 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.