Lokmat Money > बिझनेस न्यूज > फोन कॉलचा रेकॉर्ड आता दोन वर्षांपर्यंत राहणार

फोन कॉलचा रेकॉर्ड आता दोन वर्षांपर्यंत राहणार

Phone call records: देशांतर्गत, परदेशातून केलेले कॉल, सॅटेलाइट फोन, कॉन्फरन्स कॉल्स आणि मेसेज किमान दोन वर्षे सुरक्षित जतन करून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात दूरसंचार सेवा कंपन्यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:55 AM2022-02-01T06:55:20+5:302022-02-01T06:55:47+5:30

Phone call records: देशांतर्गत, परदेशातून केलेले कॉल, सॅटेलाइट फोन, कॉन्फरन्स कॉल्स आणि मेसेज किमान दोन वर्षे सुरक्षित जतन करून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात दूरसंचार सेवा कंपन्यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

Phone call records will now last for two years | फोन कॉलचा रेकॉर्ड आता दोन वर्षांपर्यंत राहणार

फोन कॉलचा रेकॉर्ड आता दोन वर्षांपर्यंत राहणार

 नवी दिल्ली : देशांतर्गत, परदेशातून केलेले कॉल, सॅटेलाइट फोन, कॉन्फरन्स कॉल्स आणि मेसेज किमान दोन वर्षे सुरक्षित जतन करून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात दूरसंचार सेवा कंपन्यांना हे आदेश देण्यात आले आहेत.
डिसेंबरमध्ये युनिफाइड लायसन्समध्ये केलेल्या दुरुस्तीनंतर दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे. ज्यामध्ये दोन वर्षांसाठी कॉल डेटा रेकॉर्डशिवाय इंटरनेट तपशील ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी ही तरतूद केवळ एका वर्षासाठी लागू होती. युनिफाइड परवानाधारक कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, रिलायन्स, जिओ, व्होडाफोन, बीएसएनएल यांचा समावेश आहे. 
 कंपन्यांना कॉल डेटा रेकॉर्ड, आयपी रेकॉर्ड आणि सर्व व्यावसायिक रेकॉर्ड किमान दोन वर्षांसाठी संग्रहित करावे लागतील. यामुळे सरकार सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांची पडताळणी करू शकणार आहे. दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट कारण नसेल तर कंपन्या ही माहिती नष्ट करू शकतात. 

Web Title: Phone call records will now last for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल