Join us

पेटीएम बारकोडची जागा या कंपनीने घ्यायला सुरुवात केली; वॉलेटमध्ये पैसे टाकलेले वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 5:49 PM

31 जानेवारीला आरबीआयने पेटीएमवर बंधने घातल्याची घोषणा केली होती. यानुसार फास्टॅग, वॉलेट आणि त्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

पेटीएमच्या बँकिंग सेवेवर रिझर्व्ह बँकेने २९ फेब्रुवारीपासून बंदी घातली आहे. यामुळे पेटीएमची सेवा वापरणाऱ्या दुकानदार, ग्राहकांची मोठी अडचण होऊ लागली आहे. अनेकांनी पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे अॅड केले होते. जे दुकानदाराकडे काही वस्तू घ्यायची झाली की आपोआप वळते होत होते. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीय. यामुळे या ग्राहकांची अडचण होऊ लागली आहे. 

31 जानेवारीला आरबीआयने पेटीएमवर बंधने घातल्याची घोषणा केली होती. यानुसार फास्टॅग, वॉलेट आणि त्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पेटीएमची सर्वात मोठी स्पर्धक कंपनी फोन पेला फायदा होऊ लागला आहे. या कंपनीने बऱ्याच ठिकाणी, किराणा दुकाने आदींकडे आपले बारकोड मोठ्या प्रमाणावर चिकटविण्यास सुरुवात केली आहे. 

अनेक दुकानदारांनी पेटीएमच्या बारकोडवर फोनपेचे बारकोड चिकटविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ज्या ग्राहकांनी त्यांच्या पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकले आहेत, त्यांनी इतर कंपन्यांचे बारकोड स्कॅन केल्यास युपीआय अकाऊंटमधून पैसे द्यावे लागत आहेत. यामुळे वॉलेटमधील पैसे तसेच अडकून पडू लागले असून त्यांचा वापर करण्यास अडचणी येत आहेत. 

पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्याचे मुख्य कारण म्हणजे योग्य ओळख न करता तयार केलेली करोडो खाती. या खात्यांतर्गत केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. एवढेच नाही तर ओळखपत्राविना कोट्यवधी रुपयांचे व्यवहारही केले होते, त्यामुळे मनी लाँड्रिंगची भीती निर्माण झाली होती.  रॉयटर्सच्या अहवालानुसार, आरबीआयने बंदी लादण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अंतर्गत १००० हून अधिक वापरकर्त्यांची खाती एका पॅनशी जोडलेली होती. शिवाय, RBI आणि ऑडिटर्स या दोघांनी केलेल्या तपासणीत पेटीएम बँक नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले. 

टॅग्स :पे-टीएमभारतीय रिझर्व्ह बँक