Lokmat Money > बिझनेस न्यूज > PhonePe द्वारे आता खरेदी करता येणार चांदीची नाणी, घरपोच सुविधाही मिळणार

PhonePe द्वारे आता खरेदी करता येणार चांदीची नाणी, घरपोच सुविधाही मिळणार

PhonePe : फोनपे अॅपद्वारे 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम चांदीची नाणी किंवा बार खरेदी केले जाऊ शकतात, जे घरी देखील वितरित केले जातील.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 08:57 PM2021-09-29T20:57:30+5:302021-09-29T20:58:23+5:30

PhonePe : फोनपे अॅपद्वारे 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम चांदीची नाणी किंवा बार खरेदी केले जाऊ शकतात, जे घरी देखील वितरित केले जातील.

phonepe allows users to buy silver coins bars on its platform to home deliver purchase | PhonePe द्वारे आता खरेदी करता येणार चांदीची नाणी, घरपोच सुविधाही मिळणार

PhonePe द्वारे आता खरेदी करता येणार चांदीची नाणी, घरपोच सुविधाही मिळणार

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट कंपनी 'फोनपे'ने (PhonePe) सिल्व्हर इनव्हेस्टमेंट लाँच केली आहे. जी युजर्संना चांदीची नाणी आणि बार खरेदी करण्यासाठी पेमेंट सुविधा प्रदान करेल. चांदीची नाणी आणि बार सर्वोत्तम प्रमाणित शुद्धतेचे आहेत, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. कंपनी खरेदी केलेल्या चांदीची घरपोच वितरण सुनिश्चित करेल. (phonepe allows users to buy silver coins bars on its platform to home deliver purchase)

फोनपे अॅपद्वारे 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम चांदीची नाणी किंवा बार खरेदी केले जाऊ शकतात, जे घरी देखील वितरित केले जातील. कंपनीने एनएबीएल (NABL) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून गुणवत्ता प्रमाणपत्रासह 99.99 टक्के शुद्ध चांदीच्या पेमेंटची प्रक्रिया करण्यासाठी सेफगोल्डसोबत (SafeGold) करार केला आहे. फोनपे अॅपद्वारे, युजर्स केवळ चांदीची नाणी आणि बारच्या खरेदीसाठी पेमेंट करू शकणार नाहीत, तर ऑनलाइन डिलिव्हरीच्या प्रगतीचा मागोवा सुद्धा घेऊ शकतील.

PhonePe वर मिळवू शकता विमा कंपन्यांचे प्रोडक्ट्स
जीवन विमा आणि सामान्य विमा उत्पादने विकण्यासाठी आयआरडीएकडून (IRDA)तत्त्वतः मान्यता मिळाली आहे, असे अलीकडेच फोनपे (PhonePe) कंपनीने म्हटले होते. तसेच, कंपनी आता आपल्या 30 कोटीहून अधिक युजर्संना विमा संबंधित सल्ला देऊ शकते, असे म्हटले होते. दरम्यान, आयआरडीएने फोनपे कंपनीला विमा ब्रोकिंग परवाना दिला आहे. आता फोनपे भारतातील सर्व विमा कंपन्यांची विमा उत्पादने विकू शकते.

Web Title: phonepe allows users to buy silver coins bars on its platform to home deliver purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.