Lokmat Money > बिझनेस न्यूज > UPI पेमेंटमध्ये PhonePe नं मारली बाजी; Paytm तिसऱ्या क्रमांकावर

UPI पेमेंटमध्ये PhonePe नं मारली बाजी; Paytm तिसऱ्या क्रमांकावर

Digital Payment : भारतात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेक जण मोठ्या प्रमाणात युपीआयची मदतही घेताना दिसतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 03:58 PM2021-08-18T15:58:27+5:302021-08-18T16:04:26+5:30

Digital Payment : भारतात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेक जण मोठ्या प्रमाणात युपीआयची मदतही घेताना दिसतात.

phonepe is at the forefront of upi payment paytm at number three google pay at second | UPI पेमेंटमध्ये PhonePe नं मारली बाजी; Paytm तिसऱ्या क्रमांकावर

UPI पेमेंटमध्ये PhonePe नं मारली बाजी; Paytm तिसऱ्या क्रमांकावर

Highlights भारतात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेक जण मोठ्या प्रमाणात युपीआयची मदतही घेताना दिसतात.

भारतात सध्या डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तसंच मोठ्या प्रमाणात लोक सध्या युपीआयची (UPI) मदत घेताना दिसतात. कोरोना काळात डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. एनपीसीआयनं (NPCI) दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात फोन पे (PhonePe) द्वारे १४९२ दशलक्ष लोकांनी पमेंट केलं. यानंतर गुगल पे (Google Pay) द्वारे १११९.२ दशलक्ष लोकांनी पेमेंट केलं. तर या यादीत तिसरा क्रमांक हा पेटीएमचा लागतो. 

याच्या मदतीने कोणत्याही खात्यावर त्वरित पैसे पाठवता येतात. यामुळे, निधी हस्तांतरण NEFT पेक्षा कमी वेळ घेते. एका मोबाईल अॅप्लिकेशनवरून अनेक बँक खात्यांमधून व्यवहार व्यवहार करता येतात. यामध्ये बँकेने दिलेला व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस वापरला जातो. आयएफएससी कोड आणि मोबाईल नंबर वापरून रक्कम हस्तांतरित केली जाते.

पेमेंट अधिकृत करण्यासाठी M-PIN (मोबाईल पिन) आवश्यक आहे. इंटरनेट कनेक्शनशिवाय फोनमध्ये 99# डायल करून या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. प्रत्येक बँकेत एक UPI प्लॅटफॉर्म आहे, जो मोबाईलच्या (Android, Windows किंवा Apple) ऑपरेटिंग सिस्टमनुसार विकसित केला जातो. यात बिल शेअरिंग सुविधादेखील आहे. वीज-पाण्याचे बिल भरणे, दुकानदाराला पैसे देणे इत्यादीसाठी ही सेवा अतिशय सोयीस्कर आहे. मोबाईल अॅपद्वारेच यासंदर्भात काही तक्रार असेल तर तीदेखील करता येते.

Web Title: phonepe is at the forefront of upi payment paytm at number three google pay at second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.