Join us  

'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 3:31 PM

News about UPI : भारतात यूपीआय व्यवहार मार्केटचा आकार विस्तारत असून, PhonePe यात पुन्हा एकदा सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. Google Pay आणि Paytm सोबत स्पर्धा करत फोन पे मोठी मजल मारली आहे. 

PhonePe UPI Market : भारतातील यूपीआय (Unified Payments Interface) मार्केटमध्ये फोनपे ची दादागिरी कायम आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण यूपीआय व्यवहारातील अर्ध्या पेक्षा जास्त व्यवहार हे फोनपे वरून करण्यात आले आहेत. फोनपे नंतर गुगल पे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पेटीएम तिसऱ्या क्रमांकावर आहे. फोनपे आणि गुगल पे मध्ये खूप मोठे अंतर आहे. 

फोनपे अमेरिका स्थित वॉलमार्टची कंपनी आहे. फोनपेची भारतात स्पर्धा गुगल पे आणि पेटीएम बरोबर आहे. गुगल पे ही सुद्धा अमेरिका स्थित कंपनी आहे. पेटीएम भारतीय कंपनी आहे. रिझर्व्ह बँकेने बंधने घातल्यानंतर पेटीएमचे यूपीआय मार्केट खूप कमी झाले आहे. 

कोणत्या यूपीआय अ‍ॅपने मारली बाजी?

NPCI ने ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, भारतातील यूपीआय मार्केटमध्ये २०,६०,७३५.५७ कोटी रुपयांच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार झाले आहेत. यात फोनपे द्वारे १०,३३,२६४.३४ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. याची संख्या ७.२३ बिलियनपेक्षा जास्त आहे.

देवाण-घेवाणीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास फोनपे यूपीआय मार्केटमधील वाटा ४८.३६ टक्के इतका आहे. 

PhonePe - 10,33,264.34 कोटी रुपये.

Google Pay - 7,42,223.07 कोटी रुपये.

Paytm - 1,13,672.16 कोटी रुपये.

ऑगस्टमध्ये यूपीआय मार्केटमध्ये कुणाचा किती टक्के वाटा?

PhonePe - 48.39 टक्के

Google Pay - 37.3 टक्के

Paytm - 7.21 टक्के

पेटीएमची परिस्थिती झाली बिकट

ऑगस्टमध्ये गुगल पे ने ७,४२,२२३.०७ कोटी रुपयांचे ५.५९ बिलियन यूपीआये पेमेंट्स केले. तर पेटीएमने १,१३,६७२.१६ कोटी रुपयांचे व्यवहार केले. गुगल पेचा यूपीआय मार्केटमधील हिस्सा ३७.३ टक्के इतका राहिला. तर पेटीएमचा मात्र ७.२१ टक्के इतकाच होता. रिझर्व्ह बँकेने बंधने घातल्यानंतर त्याचा परिणाम पेटीएमच्या यूपीआय व्यवहारांवर झाला आहे.

टॅग्स :गुगल पेपे-टीएमव्यवसायबँकिंग क्षेत्र