Lokmat Money > बिझनेस न्यूज > PhonePe चं वर्चस्व, Google Pay चं स्थान कायम; ९५ टक्के व्यवहारात याच Apps चं वर्चस्व

PhonePe चं वर्चस्व, Google Pay चं स्थान कायम; ९५ टक्के व्यवहारात याच Apps चं वर्चस्व

देशात दर महिन्याला युपीआय (UPI) पेमेंटची संख्या वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:28 AM2023-09-28T10:28:32+5:302023-09-28T10:29:36+5:30

देशात दर महिन्याला युपीआय (UPI) पेमेंटची संख्या वाढत आहे.

PhonePe s Dominance, Paytm s Big Leap Big loss to Google Pay what is going on in UPI incresed 95 7 percent online payment | PhonePe चं वर्चस्व, Google Pay चं स्थान कायम; ९५ टक्के व्यवहारात याच Apps चं वर्चस्व

PhonePe चं वर्चस्व, Google Pay चं स्थान कायम; ९५ टक्के व्यवहारात याच Apps चं वर्चस्व

देशात दर महिन्याला युपीआय (UPI) पेमेंटची संख्या वाढत आहे. देशातील 95.7 टक्के युपीआय व्यवहार फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) सारख्या थर्ड पार्टी अॅप्सद्वारे होत आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात युपीआय पेमेंटमध्ये PhonePe चा वाटा जवळपास 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

मूल्यानुसार, या वर्षी जूनमध्ये, फोन पे कडे 49.8 टक्के, गुगल पे 33 टक्के आणि पेटीएमचा 10.9 टक्के हिस्सा होता. एका वर्षापूर्वी, फोन पे चा 48.8 टक्के हिस्सा होता, तर पेटीएमचा 9.9 टक्के आणि गुगल पे चा 34.6 टक्के हिस्सा होता.

व्हॉट्सअॅपचाही खास प्रभाव नाही
एनसीपीआयनं इंडिविज्युअल थर्ड पार्टीसाठी मार्केट शेअरमध्ये 30 टक्क्यांचं कॅप लागू केलं आहे. हा नियम 15 महिन्यांनंतर लागू होईल. वॉलमार्टच्या मालकीची कंपनी फोन पे चा हिस्सा 2023 मध्ये वाढून 47.2 टक्के झाला आहे, जो गेल्या वर्षी जूनमध्ये 45.8 टक्के होता. युपीआय व्यवहारातून बँकांना कोणतेही पैसे मिळत नाहीत, त्यामुळे बँकांनी ते थर्ड पार्टी अॅप्सकडे सोपवले आहेत. जोपर्यंत बँकांचा संबंध आहे, येस बँकेचा युपीआय व्यवहारांमध्ये सर्वाधिक 0.7 टक्के वाटा आहे. असे मानले जात होते की व्हॉट्सअॅपच्या प्रवेशामुळे यूपीआयमध्ये स्पर्धा वाढू शकते, परंतु हे मेसेजिंग अॅप आतापर्यंत फार काही प्रभाव टाकू शकले नाही.

तीन अॅप्सचं वर्चस्व
वर्ल्डलाइनच्या इंडिया डिजिटल पेमेंट रिपोर्टनुसार, PhonePe, Google Pay आणि Paytm चा ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूममध्ये 95.7 टक्के वाटा आहे, जो गेल्या वर्षी जूनमध्ये 94.6 टक्के होता. जर आपण ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू पाहिल्यास, या तीन अॅप्सचा हिस्सा जून 2023 मध्ये 93.7 टक्क्यांवर पोहोचला होता, जो गेल्या वर्षी जूनमध्ये 93.4 टक्के होता. फोन पे ला इतर अॅप्सपेक्षा लवकर युपीआय स्पेसमध्ये प्रवेश करण्याचा फायदा झाला आहे.

Web Title: PhonePe s Dominance, Paytm s Big Leap Big loss to Google Pay what is going on in UPI incresed 95 7 percent online payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.