नवी दिल्ली : येत्या 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya)आहे. यानिमित्ताने मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे किंवा दान-धर्म अशी कामे चांगली असल्याचे म्हटले जाते. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. दरम्यान, डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे (PhonePe) ने अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अॅपद्वारे सोने खरेदीवर कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे.
वॉलमार्टच्या मालकीची कंपनी PhonePe ने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 22 एप्रिल 2023 रोजी 1 ग्रॅम किंवा त्याहून अधिक सोन्याच्या खरेदीवर 50 ते 500 रुपयांपर्यंतचा निश्चित कॅशबॅक मिळणार आहे. युजर्स अॅपद्वारे उच्चतम शुद्धतेचे 24 कॅरेट सोने खरेदी करू शकतात आणि कोणतेही शुल्क न आकारता बँक ग्रेड विमा लॉकरमध्ये जमा करू शकतात. तसेच, युजर्सनी ठेवलेल्या सोन्याची कधीही विक्री केल्यावर 48 तासांच्या आत त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात.
फोनपेद्वारे कशी करावी खरेदी?- आपल्या फोनपे अॅपमधील होम स्क्रीनच्या खाली Wealth वर टॅप करा.- Investment Ideas सेक्शनअंतर्गत Gold वर टॅप करा.- यानंतर Buy One Time वर टॅप करा.- आपण इच्छित रक्कम किंवा ग्रॅम प्रविष्ट करू शकता. दरम्यान, ऑफर अंतर्गत कॅशबॅक मिळविण्यासाठी, एखाद्याला किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल.- Proceed वर क्लिक करा (टीप- तुम्ही पाहत असलेली सोन्याची किंमत फक्त 5 मिनिटांसाठी वैध आहे आणि आपोआप रिफ्रेश होईल)- Proceed to Pay वर क्लिक करा आणि पसंतीचा पेमेंट मोड निवडा आणि पेमेंट करा.- तुम्ही खरेदी केलेले सोने बँक-ग्रेड लॉकरमध्ये स्टोअर केले जाईल. तुम्ही डिलिव्हरीसाठी विनंती करू शकता.
काय असते डिजिटल सोने?फिजिकल सोने चोरी किंवा हरवण्याची भीती नेहमीच असते. अशा परिस्थितीत डिजिटल सोने हे गुंतवणुकीचे नवे आणि सुरक्षित माध्यम म्हणून उदयास आले आहे. डिजिटल सोने हे ऑनलाइन सोने खरेदी करण्याचा एक मार्ग आहे. यामध्ये फिजिकल ऐवजी सोने तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवले जाईल. आपण ते खरेदी आणि विक्री देखील करू शकता. याशिवाय, गरज पडल्यास काही अतिरिक्त शुल्क भरून डिजिटल सोन्याचे फिजिकल सोन्यात रूपांतर करता येते. तुम्ही फोनपे सारख्या प्लॅटफॉर्मवरून 1 रुपयात डिजिटल सोने खरेदी करू शकता.