सुहास सुपासे, यवतमाळ
राज्यातील रेशीम उद्योग विस्तार व विकास कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजात गतिमानता, पारदर्शकता व अचूकता यावी म्हणून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन तुती (रेशीम) बागेच्या संगोपनगृहाचे छायाचित्र घेण्यासाठी एमआरएसएसी या संस्थेमार्फत मोबाईल अप्लिकेशन विकसित करण्यात येणार आहे.
मोबाईल अप्लिकेशन विकसित करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना थ्रीजी इंटरनेट पॅकसाठी १५० रुपये प्रति महिना प्रति कर्मचारी आवश्यक असून, १५२ क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकूण १.३७ लक्ष प्रति वर्ष खर्च अपेक्षित आहे. तसेच सदर मोबाईल अप्लिकेशन एमआरएसएसी या शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत विकसित करण्यासाठी १६.६६ लक्ष असे एकूण १८.३ लक्ष रकमेची तरतूद रेशीम संचालनालयास उपलब्ध करून देण्यास सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली आहे.
सन २०१५-१६ या वर्षासाठी १८ लक्ष तीन हजार रुपये ही रक्कम मोबाईल अप्लिकेशन विकसित करण्यासाठी राहणार आहे. यातून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अतिशय सोयीचे जाणार असून, त्याद्वारा कार्यालयीन कामकाजात गती, अचूकता आणि पारदर्शकपणा येण्यास मदत होणार आहे. तुती लागवड उद्योग हा राज्यात मोठ्या प्रमाणात पसरावा आणि शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय प्राप्त व्हावा, या हेतूने शासनाकडून विविध
योजना राबविल्या जात आहेत. त्यातीलच ही महत्त्वाची योजना
असून, रेशीम उद्योगासाठी अतिशय फायदेशीर ठरणार असल्याचे संकेत आहेत.
रेशीम प्रकल्पांचे रिमोट सेन्सिंगद्वारे छायाचित्रण
राज्यातील रेशीम उद्योग विस्तार व विकास कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजात गतिमानता, पारदर्शकता व अचूकता यावी म्हणून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष
By admin | Published: August 19, 2015 10:39 PM2015-08-19T22:39:46+5:302015-08-19T22:39:46+5:30