Lokmat Money > बिझनेस न्यूज > Photos: सूरतच्या डायमंड एक्सचेंजनं अमेरिकेच्या पेंटागॉनला टाकलं मागे, बनली जगातील सर्वात मोठी बिल्डिंग

Photos: सूरतच्या डायमंड एक्सचेंजनं अमेरिकेच्या पेंटागॉनला टाकलं मागे, बनली जगातील सर्वात मोठी बिल्डिंग

जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून अमेरिकन संरक्षण विभागाचं मुख्यालय पेंटागॉन ओळखली जायची. पण आता हा मान भारताला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:58 PM2023-07-19T12:58:50+5:302023-07-19T12:59:51+5:30

जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून अमेरिकन संरक्षण विभागाचं मुख्यालय पेंटागॉन ओळखली जायची. पण आता हा मान भारताला मिळणार आहे.

Photos Surat s Diamond Exchange has surpassed America s Pentagon to become the world s largest workers building | Photos: सूरतच्या डायमंड एक्सचेंजनं अमेरिकेच्या पेंटागॉनला टाकलं मागे, बनली जगातील सर्वात मोठी बिल्डिंग

Photos: सूरतच्या डायमंड एक्सचेंजनं अमेरिकेच्या पेंटागॉनला टाकलं मागे, बनली जगातील सर्वात मोठी बिल्डिंग

आतापर्यंत, जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून अमेरिकन संरक्षण विभागाचं मुख्यालय पेंटागॉन ओळखली जायची. या इमारतीत सर्वात जास्त कर्मचारी काम करायचे. पण आता ४ वर्षांमध्ये बांधलेल्या सूरतमधील सर्वात मोठ्या डायमंड एक्स्चेंजने अमेरिकेच्या पेंटागॉनला मागे टाकलं आहे. ती जगातील सर्वात मोठी इमारत बनली आहे. या इमारतीचे अधिकृत उद्घाटन या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊ शकते. सूरत ही जगाची रत्नांची राजधानी म्हणून ओळखली जाते, जिथे जगातील ९० टक्के हिरे पारखले जातं.

जबरदस्त आहे इमारात
या इमारतीत ६५,००० हून अधिक हिरे व्यावसायिक काम करू शकतील, असं सांगण्यात येत आहे. यामध्ये पॉलिशर्स, कटर आणि व्यापारी इत्यादींचा समावेश असेल. हे वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून बनवण्यात उभारण्यात आलेय.

इमारतीचं नाव काय?
या इमारतीला सूरत डायमंड बोर्स असं नाव देण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही १५ मजली इमारत ३५ एकर जागेवर पसरलेली आहे आणि त्यात नऊ आयताकृती इमारती आहेत ज्या सर्व एका सेंट्रल स्पाईननं जोडलेल्या आहेत. हे विस्तीर्ण कॉम्प्लेक्स बांधणाऱ्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यात ७.१ दशलक्ष चौरस फूटांपेक्षाही अधिक फ्लोअर स्पेस आहे. या इमारतीत १३१ लिफ्ट आणि इतर सुविधाही आहेत. या प्रोजेक्टमुळे मुंबईतून येणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मदत होणार आहे.

नॉन प्रॉफिट एक्सचेंज
एसबीडी म्हणजेच सूरत डायमंड एक्सचेंज हे नॉन प्रॉफिट एक्सचेंज आहे, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत या कंपनीची नोंदणी करण्यात आलेली आहे. ही इमारत सूरत आणि गुजरातमध्ये डायमंड बोर्सची स्थापना आणि प्रचारासाठी बांधण्यात आली आहे.

पार्किंगची मोठी जागा
या ऑफिस कॉम्लेक्समध्ये एक मनोरंजन क्षेत्र आणि पार्किंग क्षेत्र आहे जे २० लाख चौरस फुटांमध्ये पसरलेलं आहे. नव्या संकुलामुळे हजारो लोकांना व्यवसाय करण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.

हिरे कंपन्यांची कार्यालये
ही इमारत बांधण्यापूर्वीच हिरे कंपन्यांनी आपापली कार्यालये विकत घेतली होती. आंतरराष्ट्रीय डिझाइन स्पर्धेनंतर भारतीय आर्किटेक्चर फर्म मॉर्फोजेनेसिसने या इमारतीचं डिझाइन केलं.

४ वर्षात काम पूर्ण
ही वास्तू बांधण्यासाठी ४ वर्षांचा कालावधी लागला. त्याची रचना नवी दिल्ली येथील मॉर्फोजेनेसिस या भारतीय आर्किटेक्चर फर्मनं केली आहे. सीएनएननुसार, या प्रोजेक्टची किंमत सुमारे ३२ अब्ज रुपये आहे.

Web Title: Photos Surat s Diamond Exchange has surpassed America s Pentagon to become the world s largest workers building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.