Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोण आहे फिजिक्स वाला? IIT परीक्षा फेल, शिक्षणही अर्धवट.. युट्यूबवरुन कोचिंग, आज ४५०० कोटींचा व्यवसाय

कोण आहे फिजिक्स वाला? IIT परीक्षा फेल, शिक्षणही अर्धवट.. युट्यूबवरुन कोचिंग, आज ४५०० कोटींचा व्यवसाय

Who is Physics Wallah Founder : दृष्टी आयएएस कोचिंग सेंटर चालवणारे विकास दिव्यकीर्ती कोचिंग व्यवसाय विकण्याच्या मनस्थितीत असल्याची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:17 IST2025-04-02T12:08:34+5:302025-04-02T12:17:58+5:30

Who is Physics Wallah Founder : दृष्टी आयएएस कोचिंग सेंटर चालवणारे विकास दिव्यकीर्ती कोचिंग व्यवसाय विकण्याच्या मनस्थितीत असल्याची बातमी आहे.

physics wallah founder alakh pandey story who may acquire vikas divyakirti coaching business | कोण आहे फिजिक्स वाला? IIT परीक्षा फेल, शिक्षणही अर्धवट.. युट्यूबवरुन कोचिंग, आज ४५०० कोटींचा व्यवसाय

कोण आहे फिजिक्स वाला? IIT परीक्षा फेल, शिक्षणही अर्धवट.. युट्यूबवरुन कोचिंग, आज ४५०० कोटींचा व्यवसाय

Who is Physics Wallah Founder : दृष्टी आयएएस कोचिंग सेंटर चालवणारे विकास दिव्यकीर्ती यांचा एखादा तरी व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर नक्कीच पाहिला असेल. गेल्या वर्षी त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे विकास दिव्यकीर्ती वादात सापडले होते. आता पुन्हा एकदा दृष्टी आयएएस कोचिंग सेंटर चर्चेत आलं आहे. विकास दिव्यकीर्ती आता आपला शिक्षणाचा व्यवसाय विकण्याच्या मनस्थितीत असल्याची बातमी समोर आली होती. हे कोचिंग सेंटर फिजिक्स वाला खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. जर दोन्ही कंपन्यांमधील चर्चा यशस्वी झाली, तर कोचिंग व्यवसायासाठी हा करार २,५०० कोटी रुपयांमध्ये पूर्ण होईल. शिक्षण व्यवसाय क्षेत्रातील ही सर्वात मोठी डील असेल. दृष्टी IAS कोचिंग बिझनेस २५०० कोटी रुपयांना विकत घेणारा अलख पांडे देशातील करोडो विद्यार्थ्यांमध्ये फिजिक्स वाला म्हणून प्रसिद्ध आहे. यूट्यूबवरुन कोचिंग करणाऱ्या व्यक्तीने अवाढव्य कंपनी कशी उभारली? चला जाणून घेऊ.

आयआयटी फेल..
अलख पांडे कधीकाळी आयआयटी परीक्षेची तयारी करत होते. मात्र, त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी आपल्या सारख्या विद्यार्थ्यांना कोचिंग करण्याचा निर्णय घेतला. अलख पांडे आज या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो मुलांना कोचिंग देत आहे. एकेकाळी ट्युशन शिकवून दरमहा ५००० रुपये कमावणाऱ्या अलख पांडे यांनी आपल्या मेहनतीने आज मोठी कंपनी स्थापन केली आहे. जिथे अनेक शिक्षकांना लाखो रुपयांचे पॅकेज दिले जाते.

फिजिक्स वाला ओळख कशी बनली?
मूळचे प्रयागराज येथील असलेले अलख पांडे देशभरात फिजिक्स वाला म्हणून ओळखले जातात. वास्तविक, हे त्यांच्या एडटेक फर्मचे नाव आहे, जी आयआयटी आणि सिव्हिल सर्व्हिसेस सारख्या परीक्षांसाठी प्रशिक्षण देते. फिजिक्स वाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये कोचिंग देते.

यूट्यूब चॅनेलपासून ते कोचिंग व्यवसायापर्यंत
अलख पांडे यांनी २०१६ मध्ये यूट्यूब चॅनलवरून कोचिंगचा व्यवसाय सुरू केला. तर २०२० मध्ये फिजिक्स वाला फर्मची स्थापना केली. डीएनएच्या अहवालानुसार, अलख पांडे यांनी इयत्ता ८ वी पासून शिकवणी घेण्यास सुरुवात केली. अलख पांडे यांच्या आई-वडिलांनी त्यांचा मुलगा आणि मुलगी या दोघांच्याही शिक्षणासाठी घर विकले होते. अभ्यासात हुशार असलेल्या अलख पांडे यांनी आपल्या पालकांना निराश केले नाही. त्यांना दहावीत ९१ टक्के गुण मिळाले, तर बारावीचा निकाल ९३.५ टक्के लागला.

वाचा - घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? कोणता पर्याय फायदेशीर? या गोष्टींकडे अनेकजण करतात दुर्लक्ष 

अलख पांडे यांची ४५०० कोटींची नेटवर्थ
पण, अलख पांडे यांच्यासाठी खरे आव्हान आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्याचे होते. ज्यामध्ये त्यांना अपयश आले. आयआयटी परीक्षेत नापास झाल्याने त्यांनी कानपूरच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण, त्यांनी कॉलेज मध्येच सोडले. कॉलेजमधून बाहेर पडलेल्या अलख पांडे यांनी २०१७ मध्ये एका छोट्या खोलीतून शैक्षणिक YouTube व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या काळात त्यांचे व्हिडिओ इतके लोकप्रिय झाले की त्यांनी एक एड-टेक कंपनी सुरू केली, ज्यामध्ये आता ५०० हून अधिक शिक्षक आणि टेक्निकल एक्सपर्ट काम करतात. यूट्यूबवर त्यांचे ३ कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार अलख पांडे यांची अंदाजे संपत्ती ४५०० कोटी रुपये आहे.

Web Title: physics wallah founder alakh pandey story who may acquire vikas divyakirti coaching business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.