Join us

Pi Coin price: काय आहे Pi Coin जी Open Mainnet वर लाँच होताच दुप्पट झाला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:44 IST

पाय नेवर्कच्या लाँचिंगमुळे बिनेन्स आणि ओकेएक्स सारख्या प्रमुख एक्सचेंजवर संभाव्य पाय कॉइन लिस्टिंगबाबत ही अटकळ बांधली गेली आहे. 

Pi Nework चा Open Mainnet गुरुवारी लाइव्ह होणार आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये बदल आणण्याच्या दृष्टीनं याकडे पाहिलं जात आहे. हे लाँच बाह्य ब्लॉकचेन कनेक्टिव्हिटी सक्षम करेल. याद्वारे प्रथमच पाय नेवर्क इकोसिस्टमच्या बाहेर व्यवहार करण्यास देखील मदत करेल. पाय नेवर्कच्या लाँचिंगमुळे बिनेन्स आणि ओकेएक्स सारख्या प्रमुख एक्सचेंजवर संभाव्य पाय कॉइन लिस्टिंगबाबत ही अटकळ बांधली गेली आहे. 

या उत्साहामुळे पाय कॉइनच्या किंमतीत १०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या जोरदार तेजीमुळे गेल्या काही काळापासून तो १०० डॉलरचा टप्पा गाठलाय.पाय कॉइन प्रमुख एक्सचेंज लिस्टिंगवर लक्ष ठेवून आहे. पाय कॉइन लाँचसह नेटवर्कला मर्यादित इकोसिस्टममधून ओपन ब्लॉकचेनमध्ये रूपांतरित करेल. बिनेन्स, ओकेएक्स आणि इतर प्रमुख प्लॅटफॉर्म अधिकृतपणे याचं लिस्टिंग करतील की नाही यावर बाजार निरीक्षक बारीक लक्ष ठेवून आहेत. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. मात्र, या निर्णयामुळे पाय कॉइनच्या लिस्टिंगची शक्यता वाढेल, असे विश्लेषकाचे मत आहे.

पाय कॉइन लिस्टिंग किंमत

Pi /USDT स्पॉट ट्रेडिंग लिस्टिंगच्या घोषणेमुळे किंमतींमध्ये मोठी वाढ दिसून आली. पाय कॉईन थोडक्यात १०० डॉलर्सपेक्षा पुढे गेली आहे. पाय कॉइन नेटवर्कनं अद्याप अधिकृतपणे आपलं कॉईन एक्स्चेंजवर लिस्ट केलेलं नाही. 

पाय नेटवर्कसाठी पुढे काय?

पाय कॉइनच्या किमतीत वाढ झाल्यानंतर बिनेन्स आणि ओकेएक्स लिस्टिंगची पुष्टी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. जर पाय कॉइनला प्रमुख एक्सचेंजकडून पाठिंबा मिळाला, तर विश्लेषकांचा अंदाज आहे की डिमांड, लिक्विडिटी आणि नियामक स्पष्टतेवर अवलंबून संभाव्य किंमत १२० ते ५०० डॉलर्सदरम्यान असू शकते.

टॅग्स :क्रिप्टोकरन्सी