500 रुपयांच्या नोटेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. 2000 रुपयांची नोट बंद झाल्याने बनावट नोटा बाजारात फिरत आहेत. एवढेच नाही तर, 500 रुपयांच्या नोटेसंदर्भात काही बनावट मेसेजही सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. सध्या RBI गव्हर्नर यांच्या स्वाक्षरीसंदर्भातही एक मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजचे सत्य PIB फॅक्ट चेकरने समोर आणले आहे.
सध्या सोशल मिडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये, 500 रुपयांची अशी नोट घेऊ नये, ज्या नोटेवर हिरवी पट्टी RBI गव्हर्नर यांच्या स्वाक्षरी जवळ असण्या ऐवजी गांधीजींच्या फोटो जवळ असले, असे म्हणण्यात आले आहे. हा मेसेज व्हायरल झाल्याने लोकही संभ्रमात पडले आहेत. PIB Fact Check ने या मेसेजचे सत्य समोर आणले आहे.
दावा: ₹500 का वह नोट नहीं लेना चाहिए जिसमें हरी पट्टी आरबीआई गवर्नर के सिग्नेचर के पास न होकर गांधीजी की तस्वीर के पास होती है।#PIBFactCheck:
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 24, 2023
✔️यह दावा #फ़र्ज़ी है।
✔️@RBI के अनुसार दोनों ही तरह के नोट मान्य होते हैं।
अधिक जानकारी के लिए यहाँ जाएं: https://t.co/DuRgmRJxiNpic.twitter.com/T8q3m2fv8w
PIB फॅक्ट चेकने हा मेसेज बनावट असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, असे काहीही नाही, असे RBI आणि PIB ने स्पष्ट केले आहे. दोन्ही प्रकारच्या नोटा वैध आहेत. याच बरोबर, लोकांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे आणि गोंधळून जाऊ नये, असे आवाहन PIB ने जनतेला केले आहे.