Join us  

PIB Fact Check: केंद्र सरकार दर महिन्याला बेरोजगार तरुणांना देतेय 6000 रुपये? जाणून घ्या संपूर्ण सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 5:34 PM

सध्या Whatsapp वर एक मेसेज व्हायरल (Viral Message) होत आहे. यात, सरकार बेरोजगार तरुणांना (unemploymed Youth) दर महिन्याला 6000 रुपयांचे आर्थिक सहाय्य करते, असा दावा करण्यात आला आहे.

 केंद्र सरकारकडून (Central Government) विविध प्रकारच्या योजना चालविल्या जातात. हे सरकार महिला, गरीब वर्ग आणि तरुणांसह विविध वर्गांसाठी आर्थिक सहाय्य करते. सध्या Whatsapp वर एक मेसेज व्हायरल (Viral Message) होत आहे. यात, सरकार बेरोजगार तरुणांना (unemploymed Youth) दर महिन्याला 6000 रुपयांचे आर्थिक सहाय्य करते, असा दावा करण्यात आला आहे.

PIB ने किया ट्वीट -पीआयबीने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर लिहिले आहे, की पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजनेंतर्गत सरकार बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 6,000 रुपये एवढा भत्ता देत आहे, असा दावा एका व्हायरल Whatsapp मैसेजमध्ये केला जात आहे.

फॅक्ट चेकमधून समोर आलं सत्य - या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी पीआयबीने फॅक्ट चेक केले, यात हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारकडून अशा पद्धतीची कुठलीही योजना राबविली जात नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला कुठल्याही सरकारी योजनेची माहिती हवी असल्यास आपण अधिकृत वेबसाइटवरूनच माहिती मिळवणे आवश्यक आहे.

या व्हायरल मेसेजसंदर्भात पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की हा मेसेज  फेक आहे. भारत सरकार अशी कुठलीही योजना चालवत नाही. कृपया असे मेसेज फॉरवर्ड करू नये.

कुणीही करू शकते फॅक्ट चेक -जर आपल्यालाही अशा पद्धतीचा एखादा मेसेज आला, तर आपणही त्या मेसेजचे फॅक्टचेक करू शकता. पीआयबीच्या माध्यमाने कुणालाही सहज फॅक्ट चेक करता येईल. यासाठी आपल्याला ऑफिशियल लिंक https://factcheck.pib.gov.in/ वर विझिट करावी लागेल. याशिवाय आपण व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 अथवा pibfactcheck@gmail.com वरही मेसेज पाठवू शकता.

 

टॅग्स :केंद्र सरकारनरेंद्र मोदीव्हॉट्सअ‍ॅपबेरोजगारी