नवी दिल्ली : PIB Fact Check : केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याचप्रमाणे जनतेच्या हितासाठी एक फायदेशीर योजना चालवली जात आहे, तिचे नाव प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (PM Mudra Loan Yojana) आहे. या योजनेंतर्गत सरकारकडून लोकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये व्याजदर खूपच कमी आहे. दरम्यान, या योजनेबाबतचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (PIB fact check pm mudra loan yoajan viral message on 10 lac loan on deposit of 1999rs know here reality)
मेसेज सोशल मीडियावर व्हायरल
पीएम मुद्रा लोन योजनेबाबतचा (PM Mudra Loan Yojana) एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 1999 रुपये जमा केल्यावर पीएम मुद्रा कर्ज दिले जाईल, असे या मेसेजमध्ये असे सांगण्यात येत आहे. तसेच, पीएम मुद्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने जारी केलेले हे पत्र कर्ज मिळण्याची हमी असल्याचा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे.
काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य?
जर तुम्हालाही हा मेसेज आला असेल तर आधी त्याची सत्यता नक्की तपासा. काही वेळा असे फेक (बनावट) मेसेजही व्हायरल होतात. सरकारी योजनांशी संबंधित व्हायरल मेसेजची चौकशी करणाऱ्या सरकारी माहिती एजन्सी पीआयबीने याची सत्यता तपासली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने पीएम मुद्रा योजनेशी संबंधित या व्हायरल मेसेजची कसून चौकशी केली आणि यामागील सत्य सांगितले.
पीआयबीने दिली माहिती
पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून या मेसेजची माहिती दिली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) हा व्हायरल मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. तसेच, म्हटले आहे की सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत असे कोणतेही पत्र जारी केलेले नाही. केंद्र सरकारच्या नावाने अशा फसव्या प्रयत्नांपासून सावध राहा आणि सतर्क राहा, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कथित रूप से पीएम मुद्रा योजना के तहत जारी किए गए एक पत्र में ₹1999 जमा करने पर लोन उपलब्ध कराने का दावा किया जा रहा है#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 27, 2021
➡️प्रधानमंत्री मुद्रा योजना के तहत ऐसा कोई पत्र जारी नहीं किया गया है।
➡️केंद्र सरकार के नाम पर हो रहे ऐसे धोखाधड़ी के प्रयासों से सावधान रहें। pic.twitter.com/3EAmafq3uo
काय आहे पीएम मुद्रा योजना?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी 8 एप्रिल 2015 रोजी 'प्रधानमंत्री मुद्रा योजना' सुरू केली होती. या योजनेंतर्गत सर्वसामान्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारची हमी दिली जात नाही.