Join us  

केंद्र सरकार बेरोजगारांना ६ हजार रुपये भत्ता देणार? जाणून घ्या काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 3:03 PM

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वेगवेळ्या योजना राबविल्या जातात. यात महिलांसाठी तसेच शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी योजना राबविल्या जातात. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वेगवेळ्या योजना राबविल्या जातात. यात महिलांसाठी तसेच शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी योजना राबविल्या जातात. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे, या मेसेजमध्ये केंद्र सरकारने बेरोजगार तरुणांसाठी एक योजना सुरू केल्याचे सांगितले जात आहे. या योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना प्रतिमहिना ६ हजार रुपये आर्थिक मदत केंद्र सरकार देत असल्याचे माहिती दिली आहे. 

सध्या सोशल मीडियावर अनेक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सरकार बेरोजगारांना आर्थिक मदत करत असल्याचा दावा मेसेजमध्ये केला आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर, पीआयबीने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वस्तुस्थिती तपासली आहे.

एक व्हायरल व्हॉट्सअॅप संदेश असा दावा करत आहे की, सरकार प्रधानमंत्री बेरोजगारी भट्ट योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा ६,००० रुपये भत्ता देत आहे.

‘भारतीय चिप’च्या मदतीनं चालणार जगातील स्मार्टफोन, गुजरातमध्ये सुरु होणार पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प

व्हायरल झालेला हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले जात आहे. भारत सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही. असे मेसेज फॉरवर्ड करू नका असं सरकारकडून सांगितले जात आहे.

फेक मेसेज कोणाशीही शेअर करू नका

केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, असे संदेश कोणाशीही शेअर करू नयेत. यासोबतच तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा.

तुम्ही व्हायरल मेसेजची फॅक्ट चेक करू शकता

अशा फेक न्यूजपासून दूर राहा आणि या बातम्या कुणालाही शेअर करू नका, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तूर्तास अशा बातम्या फॉरवर्ड करू नका. तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक ९१८७९९७११२५९ किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करू शकता.

टॅग्स :सरकारसरकारी योजना