- चिन्मय काळे
मुंबई : जेट एअरवेजला रात्री उशीरा व पहाटे सुटणारी काही उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. कंपनीकडून पूर्ण पगार मिळाला नसल्याने वैमानिकांनी अतिरिक्त ‘ड्युटी’ करण्यास नकार दिला. त्यामुळे या विमानांचे वैमानिक विमानतळावर पोहोचलेच नाहीत. त्यातून ही परिस्थिती निर्माण झाली.
प्रीमियम दर्जाची सेवा देणाऱ्या जेट एअरवेजला चालू आर्थिक वर्षात सलग दुसºया तिमाहीत तोटा झाल्याने कंपनी आर्थिक चणचणीत आहे. यामुळे कंपनीने जुलै महिन्यात वरिष्ठ वैमानिकांना पूर्ण पगार दिला नाही. त्यावेळी वैमानिकांनी आॅगस्ट
महिन्यात अतिरिक्त ‘ड्युटी’ करण्यास नकार दिला होता. कंपनीने आश्वासन देत वैमानिकांची नाराजी तात्पुरती दूर केली. पण सप्टेंबर महिन्यात
पुन्हा वैमानिकांसह वरिष्ठ अभियंत्यांना पुन्हा अर्धा पगारच देण्यात आला. आॅक्टोबरच्या पगारासह सप्टेंबरचा बाकी असलेला पगार दिला जाईल, असे आश्वासन कंपनीने वैमानिकांना दिले होते. पण अद्याप वैमानिकांना सप्टेंबरचा पगार मिळालेला नाही.
नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड ही वैमानिकांची राष्टÑीय संघटना आहे. जेटमधील या समस्येसंबंधी गिल्डची मंगळवारी बैठक होत आहे. याबाबत गिल्डचे अध्यक्ष कॅप्टन करण चोप्रा यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, मंगळवारी नियमित मासिक बैठक आहे. पण यात जेटचा विषयही घेतला जाईल.
पगार न दिल्याने वैमानिक पोहोचलेच नाहीत!
जेट एअरवेजला रात्री उशीरा व पहाटे सुटणारी काही उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. कंपनीकडून पूर्ण पगार मिळाला नसल्याने वैमानिकांनी अतिरिक्त ‘ड्युटी’ करण्यास नकार दिला. त्यामुळे या विमानांचे वैमानिक विमानतळावर पोहोचलेच नाहीत.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 01:06 AM2018-11-20T01:06:46+5:302018-11-20T01:07:07+5:30