Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्विस बँकेतील ठेवींमध्ये झालेल्या वाढीबद्दल पियूष गोयल यांनी दिली अशी प्रतिक्रिया 

स्विस बँकेतील ठेवींमध्ये झालेल्या वाढीबद्दल पियूष गोयल यांनी दिली अशी प्रतिक्रिया 

स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल आल्यापासून मोदी सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 06:31 PM2018-06-29T18:31:03+5:302018-06-29T18:31:32+5:30

स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल आल्यापासून मोदी सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे.

Piyush Goyal statement the increase in Swiss bank deposits | स्विस बँकेतील ठेवींमध्ये झालेल्या वाढीबद्दल पियूष गोयल यांनी दिली अशी प्रतिक्रिया 

स्विस बँकेतील ठेवींमध्ये झालेल्या वाढीबद्दल पियूष गोयल यांनी दिली अशी प्रतिक्रिया 

नवी दिल्ली - स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल आल्यापासून मोदी सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे. मात्र वित्तमंत्री पियूष गोयल यांनी सरकारची बाजू मांडताना स्विस बँकेतील या ठेवींबाबत काळापैसा किंवा अवैध देवाण घेवाणीचा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल, असे म्हटले आहे. 
 स्विस नॅशनल बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये भारतीयांच्या स्विस बँकेतील ठेवींमध्ये 50 टक्के वाढ होऊन ठेवींचा आकडा 7 हजार कोटींवर पोहोचल्याचे नमूद केले होते. त्याबाबत पियूष गोयल म्हणाले,"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्वित्झर्लंडसोबत जो करार झाला आहे. त्यानुसार स्वित्झर्लंडचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर तेथील भारतीयांच्या ठेवींबाबत सगळी माहिती आम्हाला मिळेल. अशा स्थितीत काळ्या पैशाच्या अवैध देवाण घेवाणीचा निष्कर्ष काढण्याची काय गरज आहे."
 दरम्यान, काँग्रेसने परदेशात असलेल्या काळ्या पैशात झालेल्या वाढीवरून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे.  मोदींनी 100 दिवसांत 80 लाख कोटीं रुपये एवढा काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात स्वीस बँकेतील काळा पैसा 50 टक्क्यांनी वाढून 7 हजार कोटींवर पोहोलचला आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.   

Web Title: Piyush Goyal statement the increase in Swiss bank deposits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.