Join us  

इंधन दरवाढीने त्रस्त; ४० टक्के लोक म्हणतात, इलेक्ट्रिक गाडीच हवी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 5:26 AM

पेट्रोल-डिझेल वाहनांना टक्कर देण्याची तयारी

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे ८० टक्के संभाव्य ग्राहकांना कार किंवा चारचाकी वाहन खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यास भाग पाडले आहे, तर दुचाकी (बाइक, स्कूटी इ.)च्या बाबतीत ही संख्या ८२ टक्के राहिली आहे. सध्या ४० टक्के लोक आता इलेक्ट्रिक गाडीच हवी, असे म्हणत असल्याचे एका अहवालात समोर आले आहे.

मोबिलिटी आउटलूकने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षण अहवालात हा दावा करण्यात आला आहे. २.५६ लाख संभाव्य ग्राहकांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार, जवळपास ८० टक्के जणांनी कोरोना महामारीच्या प्रभावामुळे त्यांची कार खरेदीची योजना पुढे ढकलली. त्यामुळे वाहन क्षेत्रावर कोरोनाचा पडलेला प्रभाव दूर होण्यास वेळ लागेल. चारचाकी वाहने बाळगू इच्छिणाऱ्यांपैकी १८ टक्के लोकांना वैयक्तिक बचतीतून वाहने खरेदी करायची आहेत. अहवालानुसार, इलेक्ट्रिक वाहनांकडे यंदा कल वाढला आहे. खरेदीदारांना आता हे समजू लागले आहे की इलेक्ट्रिक वाहनेदेखील पारंपरिक वाहनांशी स्पर्धा करू शकतात आणि त्यांची किंमतदेखील किफायतशीर ठरेल. तथापि, चार्जिंग सुविधांबाबत त्यांच्यातील विश्वास अजून निर्माण झालेला नाही.

वाहन खरेदी वाढणारअहवाल तयार करणाऱ्या कारट्रेड टेक यांनी म्हटले आहे की, हे सर्वेक्षण नवीन वाहन खरेदीच्या हेतूबद्दल सकारात्मक भावना दर्शविते; परंतु अनेक घटक त्यांच्या निर्णयावर परिणाम करतात. सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, २० टक्के लोक यावर्षी वापरलेली वाहने खरेदी करण्याचा विचार करत आहेत जे मागील वर्षी १४ टक्के होते.

टॅग्स :पेट्रोलकार