Join us

नवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घ्यायचाय?; ॲमेझॉनवर मिळवा बेस्ट डील्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:11 PM

तुम्हाला नवा कॉम्प्युटर/लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर ॲमेझॉनशिवाय चांगला प्लॅटफॉर्म असूच शकत नाही.

तुमचा कॉम्प्युटर/लॅपटॉप नादुरुस्त झाला असेल किंवा तुम्हाला नवा कॉम्प्युटर/लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर ॲमेझॉनशिवाय चांगला प्लॅटफॉर्म असूच शकत नाही. या ठिकाणी तुम्हाला निरनिराळ्या ब्रँडचे लॅपटॉप, कॉम्प्युटर्स अतिशय वाजवी किंमतीत मिळतील आणि त्यासोबतच ॲक्सेसरीजवरही चांगला डिस्काऊंट मिळतो. तुम्हाला तुमचं जुनं डिव्हाईस देऊनही नवं खरेदी करता येऊ शकतं. 

मोठे, नामांकित ब्रँड्स

ॲमेझॉनवर तुम्ही ॲपल, लिनोवो, एमआय, असूस, डेल, एचपी सारख्या कंपन्यांचे ब्रँड्सही मिळतील. कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये किती रॅम देण्यात आली आहे, कोणता प्रोसेसर आहे, सीपीयू स्पीड कोणाचा अधिक आहे, कॉम्प्युटर/लॅपटॉपचं वजन किती आहे, बॅटरी लाईफ किती आहे, ग्राफिक प्रोसेसर कोणता देण्यात आला आहे आणि कोणत्या सिस्टमची ऑपरेटिंग सिस्टम चांगली आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका क्लिकमध्ये याठिकाणी मिळतील. यासोबतच ज्यांनी वस्तू खरेदी केल्या आहेत, त्यांचा अनुभव कसा आहे असे रिव्ह्यूदेखील तुम्हाला वाचायला मिळतात. 

डिव्हाईसच नाही, ॲक्सेसरिजही

कॉम्प्युटर/लॅपटॉपसह या ठिकाणी तुम्हाला टॅब, लॅपटॉपच्या अॅक्सेसरिजदेखील खरेदी करता येऊ शकतात. माऊस, की-बोर्ड, युएसबी, केबल्स ब्रँड्सनुसार तुम्हाला मिळतील. कोरोनाकाळात अनेक जण आपल्या घरातूनच काम करत आहेत. अशा परिस्थितीत काम करणं सोपं करण्यासाठी आवश्यक असलेल्या अॅक्सेसरीजही उपलब्ध आहेत. यासोबत अनेक गेमिंग अॅक्सेसरीजही ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

कशा असतात वस्तू?

ऑर्डर करण्यापूर्वी ग्राहकांना त्या वस्तूची एकदम योग्य माहिती दिली जाते. पेमेंट पर्यायावर क्लिक करण्यापूर्वी प्रॉडक्ट नवा आहे की तो रिन्यू करण्यात आला आहे याची माहितीही ग्राहकांना देण्यात येते. तसंच प्रॉडक्टची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची यादीही ग्राहकांना दाखवली जाते. काही प्रॉडक्टवर त्यांच्या डिलिव्हरीच्या वेळी पैसै देण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. तर काही प्रॉडक्ट्स खरेदी करण्यासाठी ऑनलाइन पैसेदेखील भरावे लागतात.

टॉप डीलचा फायदा

ई-कॉमर्स साईटवर ग्राहकांना दररोज टॉप डीलचा पर्यायही देण्यात येतो. यामध्ये तुम्ही निरनिराळ्या ब्रँड्सच्या कॉम्प्युटर/लॅपटॉपची खास फीचर्स, त्यांची किंमत आणि गुणवत्ता तपासून पाहू शकता. याशिवाय तुम्ही अन्य साईट्ससोबतही तुलना करू शकता. ॲमेझॉनकड़ून सातत्यानं नवनव्या डील्स ग्राहकांना देण्यात येतात. यासाठीच जेव्हा तुम्ही आता लॅपटॉप/कॉम्प्युटर घेण्याचा विचार करत असाल तेव्हा या ठिकाणी मिळणाऱ्या टॉप डील्सवर नक्कीच एक नजर टाका.

टॅग्स :अ‍ॅमेझॉनलॅपटॉपमोबाइलस्मार्टफोन